14 एप्रिल पर्यंत नागरीकांनी घरात बसावे

0

कजगाव | प्रतिनिधी निलेश पाटील

कजगाव-सध्या कोरोना नामक व्हायरसची संपुर्ण जगात दहशत माजवली असुन अवघे जग बंदिस्त झाले आहे.कोरोना व्हायरस भारतातही धुमाकुळ घालत आहे.महाराष्ट्रातही कोरोनाचे रुग्ण वाढतांना दिसत आहे.कोरोनावर सध्या तरी औषध नाही.घरात बसणे हाच एकमेव मार्ग आहे.त्यादृष्टीने प्रशासन नागरीकांनी घरात बसावे म्हणुन आवाहन केले जात आहे.त्याचाच एक भाग म्हणुन 22 मार्च रोजी संपुर्ण भारतात जनता कर्फ्यु पाळण्यात आला.त्यांस चांगला प्रतिसाद मिळाला.त्यानंतर पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी यांनी 14 एप्रिल पर्यत संपुर्ण भारत लाँकडाऊन केले.नागरीकांनी घरातच बसावे.नागरीकांनी घरातच बसावे म्हणुन भडगाव तालुका वैद्यकिय अधिकारी डाँ.सुचिता आकडे,प्राथमिक आरोग्य केंद्र कजगावचे वैद्यकिय अधिकारी डाँ.प्रशांत पाटील,डाँ.स्वप्निल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्न केले जात आहे.त्याचाच एक भाग म्हणुन ध्वनीक्षेपकाव्दारे जनजागृती केली जात आहे.ध्वनीक्षेपकाव्दारे जनजागृती करण्यासाठी गोंडगाव येथील आरोग्य सेवक संजय सोनार कळवाडीकर यांच्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे.त्यानुसार त्यांनी गेल्या चार दिवसात कजगाव व गुढे प्राथमिक केंद्रा अंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये ध्वनीक्षेपकाव्दारे नागरीकांनी घरात बसावे म्हणुन आवाहन केले आहे.याबाबतीत अधिक माहीती देतांना आरोग्य सेवक संजय सोनार कळवाडीकर यांनी सांगितले की कोरोना पासुन बचाव करायचा असेल तर नागरीकांनी घरात बसणे आवश्यक आहे.मी गेल्या काही दिवसापासुन प्रत्येक गावात ध्वनीक्षेपकाव्दारे नागरीकांना त्याबाबत आवाहन करीत असतांना सुरवातीला नागरीक याबाबतीत काळजी घेतांना दिसुन आले नाही.नागरीक चौका-चौकात,मंदिरावर येऊन बसतांना दिसुन येत होते.हे चित्र बघुन मी भडगाव येथील पोलीस निरीक्षक साहेबांना ग्रामीण भागात नागरीक घराबाहेर पडतात.काळजी घेत नाही.अशी तक्रार दिली.त्याचा परिणाम मला कालपासुन जाणवु लागला.काल मी जनजागृती करीत असतांना नागरीक घराबाहेर पडतांना दिसुन आले नाही.तरी नागरीकांनी 14 एप्रिल पर्यंत घराबाहेर पडु नये असे आवाहन सोनार यांनी केले.तसेच अनेक गावांमध्ये कोरोना रक्षक स्वंयसेवक नेमले आहे.त्यांच्या मार्फतही गावात नागरीकांना घराबाहेर निघु नये याबाबतीत प्रयत्न केले जात आहे.ज्या गावांमध्ये अद्यापही कोरोना रक्षक स्वंयसेवक नेमले नसतील त्यांनी असे स्वंयसेवक आपल्या गावांमध्ये नेमणुक करुन नागरीकांनी घराबाहेर पडु नये याबाबतीत प्रयत्न करावे.असे आवाहन केले आहे.नागरीकांनी आरोग्य विभागाला सहकार्य करुन कोरोना मुक्तीसाठी प्रयत्न करावे.

Leave A Reply

Your email address will not be published.