१८ ते ४४ वयोवटाला लसीकरण सुरू करण्याची आ.सावकरेंकडे भाजपाची मागणी

0

 वरणगाव : शासनाने १ मे पासुन १८ ते ४४ वयोगटातील नागरिकाना कोवीड लसी करण करण्याचे जाहीर झाल्यानतंर ही शहरातील ग्रामीण रुग्णालयात अद्यापही लसी करणास सुरुवात झाली नसल्याने शहर भाजपाच्या वतीने आमदार संजय सावकरे यांच्याकडे मागणी केल्याने त्यांनी जिल्हाधिकारी यांच्या कडे पत्र लिहुन लसीकरणाला सुरुवात करण्याची मागणी केली आहे.

कोरोना आजारावर शासनाने चैन द ब्रेक या उद्देशाने सर्वत्र कडक निर्बध लागु करीत  जेष्ठ नागरिकाना लसीकरण करण्यास सुरुवात केली असुन १८ ते ४४ वयोगटातील सर्व नागरीकाना लसीकरणासाठी १ मे पासुन देण्याचे आयोजन केले होते मात्र शहरातील ग्रामीण रुग्णा यात या साठी कुठलीच नोंदणी किंवा लसीकरण करणा हलचाली नसल्याने भारतीय जनता पार्टीच्या पदाधीकाऱ्यानी कोरोनाच्या या महामारीत जिल्हयातील प्रशासन तरूणावर एक प्रकारे अन्याय करीत असुन अठरा वर्षा वरील नागरीकाचे जिव जाण्याची प्रशासन वाट  पाहत तर नाही ना ! असा संतप्त सवाल करीत ग्रामीण रुग्णालयाच्या डॉक्टराना या मागणीचे निवेदन देत आमदार सजंय सावकारे यांना  लसीकरण सुरू करण्याची मागणी केल्याने आ सावकारे यांनी तत्काळ जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना पत्र लिहुन या सर्दभात मागणी करीत शहरात दोन लसी करण केंद्र सुरु करण्यासाठी सुचविले आहे.

आमदार संजय सावकारे यांना निवेदन देते वेळी भाजपाचे सुनिल काळे, शे अखलाक शे युसुफ, मिलिद मेढे , संदिप भोई, सुनिल माळी, प्रणिती पाटील, हितिश चौधरी, श्यामराव धनगर, सुभाष धनगर, कृष्णा माळी, प्रविण चांदणे, मिलीद भैसे, आदी पदाधिकारी उपस्थीत होते.

Leave A Reply

Your email address will not be published.