भडगाव पोलीस स्टेशनकडून इफ्तार पार्टी आयोजित न करता गरीब नागरीकांना शिरखुर्मा किराणा किट वाटप

0

भडगाव (प्रतिनिधी) : भडगाव पोलीस स्टेशनच्या वतीने दि ९ रोजी सायंकाळी रमजान निमित्ताने इफ्तार पार्टी साजरी न करता रमजान ईद साठी शिरखुर्मा किराणा किट वाटप च्या एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

दर वर्षी जातीय सलोखा राबवित पोलीस स्टेशन च्या वतीने इफ्तार पार्टी साजरी करण्यात येते . मात्र यंदा कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव असल्याने इफतार पार्टीचे आयोजन न करता मुस्लिम समाजातील गरीब नागरिकांना पोलीस स्टेशनला बोलून रमजान ईदच्या दिवशी शीरखुर्मा तयार करण्यासाठी लागणारी आवश्यक किराणा किट देण्यात आली.

त्यावेळी मुस्लिम पंचकमिटी तील इम्रान अली शहादत अली, सय्यद आसीम मिर्झा, अल्ताफ हाजी,जाकीर कुरेशी, सोनू मुनाफ खाटीक, इसाक मलिक, राजू शेख, बाबुशेठ ,नागरिक उपस्थित होते. तर भडगाव पोलिस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक आनंद पठारे, पोलिस उपनिरीक्षक सुशील सोनवणे ,लक्ष्मण पाटील, हिरालाल पाटील, किरण ब्राह्मणे, प्रल्हाद शिंदे , या वेळी हजर होते. यांच्या हस्ते गरजूंना शिरखुर्मा किट चे वाटप करण्यात आले. हा कार्यक्रम पोलीस निरीक्षक अशोक उतेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.

Leave A Reply

Your email address will not be published.