ताठ नजरेने पाहण्यावरून तरुणाला मारहाण ; चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल

0

चाळीसगाव :-(प्रतिनिधी) ताठ मानेने का पाहतो या कारणावरून तरुणाला अडवून मारहाण करून आमच्या नादी लागला तर जीवंत सोडणार नाही अशी धमकी दिल्याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीसात चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेची महिती अशी की, उज्वल खुशाल पाटील (19)रा.शनिमंदिराचे पाठीमागे, दत्तवाडी चाळीसगाव हा दि.9 रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास मित्रांबरोबर एका मित्राच्या घरी गेम खेळण्यास गेले होते. दुपारी 4.30 वाजेच्या सुमारास मालेगाव नाकाजवळील एका दुकानावर पाण्याची बाटली घेण्यास दुचाकीने गेला असता कल्पेश सुनील पाटील रा. जुना मालेगाव रोड, दीपराज पाटील पूर्ण नाव माहित नाही,पृथ्वीराज चव्हाण पूर्ण नाव माहित नाही व त्यांचे सोबत असलेला एक अनोळखी तरुण यांनी उज्वल याची दुचाकी थांबवून कल्पेश याने माझ्याकडे ताठ मानेने का पाहतो असे म्हणत शिवीगाळ करून चापटाबु्न्नयांनी मारहाण केली. तर इतरांनी खाली ओढून लाथाबु्न्नयांनी मारहाण केली.कल्पेश पाटील याने हातातील काहीतरी जड वस्तुने डो्नयाच्या डाव्या बाजुला मारून दुखापत केली.जातांना आमच्या नादी लागला तर तुला जीवंत सोडणार नाही अशी धमकी दिली.या भांडणात उज्वलच्या खिशातील दोन हजार रूपये पडून नुकसान झाले.

याप्रकरणी उज्वल पाटील याने दिलेल्या फिर्यादीवरून चौघे संशयितांच्या विरोधात चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला भादंवि कलम 324,323,504, 506,427,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीस तपास करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.