हैद्राबाद हत्याचार; महाविकास आघाडीतर्फे निषेध

0

जामनेर – हैद्राबाद येथील पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रियंका रेड्डी यांच्यावर अमानुष व मानवतेला काळिमा फासणारे कृत्य करणार्‍या नराधमांविरुद्ध तात्काळ जलद न्यालायत खटला चालवून सदर आरोपीना त्वरित फाशीची शिक्षा देण्यात यावी. अश्या मागणीचे निवेदन येथील महाविकास आघाडीतर्फे तहसीलदार अरुण शेवाळे यांना दि.3 रोजी देण्यात आले.

भारतामध्ये दर चार मिनिटाला एका महिलेवर अत्याचाराची घटना घडत आहे.ही समाझ्यासाठी व येणार्‍या काळात धोक्याची घंटा आहे.केंद्रसरकारने महिलांवर अत्याचार करणार्‍या आरोपींविरुद्ध कठोर कायदा करावा अशी मागणीही या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

या निवेदनावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा उपाध्येक्ष विलास राजपूत,तालुका अध्यक्ष राजेंद्र पाटील,उपाध्येक्ष प्रल्हाद बोरसे, विधानसभा क्षेत्रप्रमुख किशोर पाटील,जामनेर शहर अध्यक्ष जितेश पाटील,शहर युवक अध्येक्ष विनोद माळी, तालुका युवक कार्यअध्येक्ष सागर कुमावत, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वकील सेलचे जिल्हा अध्यक्ष न्यानेश्वर बोरसे, डॉक्टर सेलचे तालुका अध्यक्ष डॉ. प्रशांत पाटील,ओबीसी सेल चे अध्येक्ष प्रभू झालटे, शिव सेनेचे माजी तालुका अध्यक्ष प्रकाश पाटील, माजी शहर प्रमुख सुधाकर सेट सराफ, माजी उपप्रमुख दीपक सोनें, उपप्रमुख न्यानेश्वर जंजाळ,भारतीय राष्ट्रीय काँग्रेस अल्पसंख्यांक सेलचे शहर अध्यक्ष मुसा पिंजारी, संदीप हिवाळे,अमोल पाटील,राहुल गुजर, नरेंद्र जंजाळ, अर्जुन पाटील, रऊप शेख, शेक शकुर, योगेश पाटील, शिवाजी पाटील, उत्तम पाटील, मोहम्मद खालीत आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.