जस्टीस फाॅर प्रियंका……हँग द रेपिस्ट! पुशवैद्यकिय डॉक्टर्सची मोर्चाद्वारे मागणी

0

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

जळगाव(प्रतिनिधी) जस्टीस फॉर प्रियंका……हँग द रेपिस्ट अर्थात प्रियंका रेड्डीला न्याय मिळवून देण्यासाठी बलात्कारांना फाशी द्या अशा मागणीचे निवेदन आज जिल्हाभरातील पशु वैद्यकिय डॉक्टरांनी मोर्चाद्वारे जावून अपर जिल्हाधिकाऱ्यांना दिले. सकाळी ११ वाजेपासून जिल्हयातील पशुवैद्यकिय डॉक्टर्स शहरातील जी.एस. ग्राऊंडवर एकत्र आले. १२ वाजता मोर्चा सुरू झाला. मोर्चात तब्बल २५० ते ३०० पशुवैद्यकिय स्त्री-पुरूष डॉक्टर्स सहभागी झाले होते.
मोर्चाच्या अग्रभागी महिला डॉक्टर्सनी हाता धरलेल्या फलकावर डॉ.प्रियंका रेडीचे छायाचित्र व बलात्कारांना फाशी द्या अशी मागणी स्पष्ट दिसत होती. नवीन बस स्थानक, स्वातंत्र चौक मार्गे हा मोर्चा दुपारी १ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहचला. येेेथे पोलिसांचा चोख बंदोबस्त होता. कार्यालयाच्या गेटजवळ मोर्चा अडविण्यात आला. त्यानंतर डॉक्टर्सचे
शिष्यमंडळ निवेदन घेवून आत गेले.
अप्पर जिल्हाधिकारी नंदकुमार बेडसे यांनी शिष्ट मंडळाकडून निवेदन स्विकारले.
निवेदनात म्हटले आहे की, कोल्लुर जि.हैद्राबाद येथील पशुवैद्यकिय महिला डॉक्टर प्रियंका रेड्डी या शासकीय सेवेत कर्तव्य बजावत असतांना त्यांच्यावर बलात्कार करून अत्यंत निघृणपणे खून करण्यात आला. या घटनेचा आम्ही निषेध नोंदवित आहोत. भारतीय संविधानाच्या अभिप्रेत महिलांचे व्यक्ती स्वातंत्र्य व संरक्षण याबाबत गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. यास्तव या निवेदनाद्वारे संविधान स्मरण की, महिला संरक्षण संदर्भात तक्रारीसाठी ज्या पोलीस स्टेशनला तक्रार दाखल होईल तेथूनच कार्यक्षेत्राचे कारण न दाखवता संबंधितास
इतर पोलीस स्टेशनला पाठविणे बंद झाले पाहिजे. इतर पोलीस स्टेशनचे कार्यक्षेत्र असल्यास कार्यक्षेत्राची सबब न देता एफ.आय.आर.तात्काळ ऑनलाईन नोंद करण्याची पध्दत कार्यान्वित करावी तसेच तेथूनच तात्काळ मदतीची कायदेशीर कार्यवाही सुरू करण्यात यावी. प्रियंका रेड्डी यांचा खुन ही अत्यंत लाजीरवाणी घटना असून तिच्या बलात्कारांना तात्काळ फाशी देण्यात यावी अशी आग्रही मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
आजच्या मोर्यात शेकडो पशुवैद्यकिय डॉक्टर्स सहभागी झाले होते. तसेच
जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणाऱ्या शिष्ट मंडळात डॉ.पी.एल.राणे, डॉ.ए.एम.इंगळे, डॉ.स्वप्नजा लोखंडे, डॉ.अनिल देशमुख, डॉ.जे.एस.नारखेडे, डॉ.ए.डी.पाटील, डॉ.एन.आर.पाटील, डॉ.नितीन सोनवणे, डॉ.राधा कोळी,डॉ.दिप्ती कचवे, डॉ.योगिता अमृतकर, डॉ.उर्मिला जगताप यांचा समावेश होता.

Leave A Reply

Your email address will not be published.