हुडको प्रकरणी उच्च न्यायालयात अपील करणार- आ. राजुमामा भोळे

0

जळगाव दि.23-महापालिकेचे अपील डीआरएटी न्यायालयाने सोमवारी फेटाळले आहे. त्यामुळे हुडकोची कारवाई टाळण्यासाठी महानगरपालिका उच्च न्यायालयात जावून अपील करणार असून स्थगिती मिळवणार असल्याची माहिती आ. राजुमामा भोळे यांनी बुधवारी संध्याकाळी दिली.
काल मंगळवारी झालेल्या स्थायी समितीच्या सभेत शिवसेनेचे नगरसेवक नितीन लढ्ढा यांनी महापालिकेने डीआरएटी न्यायालयात केलेले अपील फेटाळल्याने पालिकेवर केव्हाही बँक खाते सिलची कारवाई होऊ शकते, अशी माहिती दिली होती. या बातमीने मनपात खळबळ माजली होती. याबाबत आ. राजुमामा भोळे यांनी बुधवारी आयुक्तांशी मॅरेथॉन चर्चा केली. दरम्यान हुडकोची कारवाई टाळण्यासाठी उच्च न्यायालयात अपील दाखल करुन आधी स्थगिती मिळवू असे त्यांनी सांगितले. न्यायालयाच्या निकालानंतर लगेचच कारवाई होत नसून 30 दिवसांचा अवधी अपीलासाठी दिला जातो. त्यामुळे लवकरच अपीलात जावून आधी स्थगिती मिळवणार असून नंतर एकरक्कमी परतफेडचा प्रस्ताव ठेवणार असल्याचे ते म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.