हिंगोणा ग्रा.पं. अंतर्गत मनरेगा, घरकुल आदी शासन कामात मोठा आर्थिक घोटाळा

0

यावल ( प्रतिनिधी ) तालुक्यातील हिंगोणा ग्राम पंचायत अंतर्गत मनरेगा व इंदीरा आवास घरकुल योजनेत मोठा आर्थिक गोंधळ झाल्याची तक्रार येथील सामाजीक कार्यकर्ते व विद्यार्थी मोर्चाचे जळगाव जिल्हा सचिव आकाश तायडे यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे .

या संदर्भात आकाश तायडे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, हिंगोणा ग्रामपंचायत व्दारे गावात विविध ठीकाणी गावा बाहेरील रस्त्यावर लाखो रुपये खर्च करून वृक्षांची लागवड करण्यात आल्याचे दाखविण्यात आले असुन, हिंगोणा मोर धरण प्रकल्प रस्ता १ , ३५०वृक्षांची लागवड , हिंगोणा पाटदुर्तफा ६०० वृक्षांची लागवड , बोरखेडा बु॥मोर धरण जवळ संबंधीत जागेवर १५०० वृक्षांची लागवड , एनयुआर अंतर्गत हिंगोणा प्रकल्प १ लाख रोपे र्निमीती करणे त्याच प्रमाणे परिसरात २००० वृक्षरोपण, हिंगोणा ते बोरखेडा साईडपट्टयावर वृक्ष लागवड आदी लाखो रुपये खर्चाची कामे प्रत्यक्षात न करता दाखविण्यात आली आहे .

त्याचप्रमाणे ग्रामपंचायत अंतर्गत गावात कामे सुरू झालेली इंदीरा आवास योजनांची घरे ग्रामपंचायत कर्मचारी आणी ग्रामरोजगार सेवकांच्या नांवाची मंजुर करण्यात आली आहे . गावात कामाला न जाणाऱ्या मंडळींची रोजगार हमी योजनेच्या कामात सक्रीय मजुर असल्याचे दाखवुन त्यांचे नांवे नोंदविण्यात आली आहे. गावातील स्वस्त धान्य दुकानचालक सुरेश नथ्थु नेहते यांचे जॉब कार्ड लाऊन सामान्य लोकांच्या घरकुल लाभार्थ्यांची मजुरी ही वर्ग करण्यात आली आहे ज्यांचे घरकुल मंजुर झालेले आहेत त्या लाभार्थ्यांना याची कल्पना देखील नसल्याचे धक्का दायक प्रकार सध्या हिंगोणा ग्रामपंचायतीच्या अंतर्गत सुरू असुन ग्रामपंचायतच्या माध्यमातुन शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवण्याच्या नांवाखाली अनेक बोगस लाभार्थींच्या नांवांची नोंद करण्यात आली असुन प्रत्यक्षात मात्र अशी कुठलीही कामे झाल्याचे आज रोजी दिसुन येत असल्याने ग्रामपंचायतीच्या वतीने वरील सर्व कामात महाघोळ करून लाखों रुपयांचा भ्रष्ठाचार केल्याचे दिसुन येत असुन तहसीलदार आणी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यावल यांनी तात्काळ या सर्व कामांची चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी विद्यार्थी मोर्चाचे जिल्हा सचिव आकाश रमेश तायडे यांनी निवेदनाद्वारे केली आहे .

Leave A Reply

Your email address will not be published.