जिल्ह्यातील करोनाबाधितांच्या संख्येने ५० हजाराचा टप्पा ओलांडला ; पाहा आजची आकडेवारी

0

जळगाव  : जळगाव जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस कमी होत असल्याने जिल्ह्यासाठी दिलासादायक आहे. जिल्ह्यात आज २८२ कोरोना बाधित रूग्ण आढळून आलेत तर ५०५ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. आज २ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील एकुण बाधिताचा आकडा ५० हजार २२२ वर गेला आहे तर त्यात ४५ हजार ३१० रूग्ण बरे होवून घरी परतले आहे.

आजची आकडेवारी

जळगाव शहर -७३ जळगाव ग्रामीण-५, भुसावळ-३१, अमळनेर-१५, चोपडा-४०, पाचोरा-४, भडगाव-३, धरणगाव-२, यावल-५, एरंडोल-१, जामनेर-७०, रावेर-९, पारोळा-४, चाळीसगाव-१३, मुक्ताईनगर-६, बोदवड-१ आणि अन्य जिल्हा ० असे एकुण २८२ रूग्ण आज आढळून आले आहे.

जिल्ह्याचा रिकव्हरीचा रेट हा ९०.२२ टक्क्यांपर्यंत आला आहे. आज २ रूग्णांचा मृत्यू झाला असून एकुण जिल्ह्यात १२११ रूग्णांची मृत्यूचा आकडा पोहचला आहे. तर जिल्ह्यात आता ३ हजार ७०१ रूग्ण कोवीड सेंटरमध्ये उपचार घेत आहे. अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.