हिंगणघाट पीडितेला रायसोनी महाविद्यालयात श्रद्धांजली

0

जळगाव – येथील जी. एच. रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयात हिंगणघाट येथील घटनेत दुर्दैवी अंत झालेल्या पीडितेला श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. संगणक विभाग प्रमुख प्रा. सोनल पाटील यांनी ही श्रद्धांजली सभा आयोजित केली होती.

पुरोगामी महाराष्ट्रासाठी अत्यंत लाजिरवाणी अशी बाब व काळा दिवस असल्याच्या भावना प्रा. सोनल पाटील यांनी व्यक्त केली. आपल्या घरात महिलांवर असे अत्याचार करणारे विकृत जन्माला येऊ न देणे हीच तिच्यासाठी खरी श्रद्धांजली आहे, यावेळी प्राचार्य डॉ. ए. जी. मॅथ्यू , रायसोनी इस्टट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल, प्रा. हिरालाल साळुंखे, प्रा. स्वाती पाटील, प्रा. शीतल जाधव, प्रा. स्वप्नील देशमुख आदि  शिक्षकवृंद, विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.