हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना लागली पावसाची प्रतीक्षा

0

निपाणे, ता एरंडोल (वार्ताहर) : गेल्या ४-५ दिवसांपासून वरुण  राजाने हुलकावणी दिल्याने निपाणे परीसतील शेतकरी  वर्ग हवालदिल झाले आहे.  हवामान विभागाने जळगाव जिल्ह्यात पावसाचा अंदाज दिला असल्याने राहिलेल्या शेतकऱ्यांनी  उर्वरित राहिलेली पेरणी  पूर्ण केली असून  निसर्गाच्या भरवशावर घरात ठेवलेले बी बियाणे शेतात पेरुन दिले आहे.

मात्र पेरलेल्या बियाण्याला कोऱ्या लागत असून कोवळ्या कोबांना चिमणी पाखरे खार किटक वान्या खात आहेत त्यामुळे  शेतकऱ्यांना पिकांची मोठी चिंता लागली आहे. पाऊस यावा यासाठी बळीराजा सारखे आकाशाकडे डोळे लावून बसलाअसून वरुण राज्याची आराधना करु लागला आहे येरे येरे मेघू राया नको लावू दोन्ही डोया असे म्हणत गयावया करु लागला आहे. महागडे बियाणे काळ्या आईत पेरुन  शेतकऱ्याने त्याचे कर्तव्य केले आता तारणे मारणे भगवंताच्या हाती आहे आपल्याला आपली चिंता आहे विश्व  निर्माण करणाऱ्याला सर्वांची चिंता आहे म्हणतातना तुझी चिंता त्यासी सर्व आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.