वरणगाव येथे स्व. हरिभाऊ जावळे यांना सर्वपक्षीय श्रध्दाजली !

0

वरणगाव (प्रतिनिधी) : भारतीय जनता पार्टीने एक सच्चा एकनिष्ठ व सचोटीचा नेता गमावला असल्याची भावना   सर्वपक्षीय घेण्यात आलेल्या शोक सभेत व्यक्त करण्यात आली. त्यावेळी  शहरातील विविध राजकिय पक्षाच्या पदाधीकाऱ्यानी मा खासदार स्व जावळे यांना श्रद्धांजली अर्पण केली.

भारतीय जनता पार्टीचे माजी खा हरिभाऊ जावळे यांच्या निधनाने वरणगाव शहरातीत सर्व राजकिय पक्षाच्या वतीने बस स्थानक चौकात शोक सभा घेण्यात आली यावेळी मान्यवरानी आपल्या भावना व्यक्त करताना स्व हरिभाऊ जावळे यांच्या कार्याचा अनूभव व त्यांच्याशी असलेल्या संबधामुळे   स्व जावळे हे जरी भारतीय जनता पार्टीचे नेते असले  तरी  त्यांचे  सर्वच राजकिय पक्षाच्या नेत्यांशी व  कार्यकत्याशी चांगले सबंध  होते ते फक्त शेतकऱ्याचे नेते नव्हते तर तळागाळातील कार्यकर्त्याशी त्यांची नाळ जुळलेली होती व सयमी राजकारणी म्हणुन त्यांची  ओळख  होती त्यांच्या अशा अचानक जाण्यामुळे जिल्ह्यातील एकनिष्ठ व सचोटीचा नेता पक्षाने गमावला असल्याच्या भावना व्यक्त करीत श्रध्दाजली अर्पण करण्यात आली.

या  वेळी नगराध्यक्ष सुनिल काळे उपनगराध्यक्ष शे अखलाक शे युसुफ , नगरसेवक सुधाकर जावळे नगरसेविका अरुणाबाई  इंगळे,  राष्ट्रवादीचे नगरसेवक राजेंद्र चौधरी , रवि सोनवणे , शिवसेनेचे  समाधान महाजन , विलास मुळे , सुभाष चौधरी  समाधान चौधरी , अजय पाटील , प्रविण पाटील , नटराज चौधरी . महेश सोनवणे , कस्तुब पाटील , श्यामराव धनगर ,सतोंष माळी , अतुल झाबंरे , राजेश चौधरी , सुरेश चौधरी , इप्तेखार मिर्जा इत्यादीनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पमाला अर्पण केली .,

Leave A Reply

Your email address will not be published.