स्‍वॅबचे नमुने जास्‍तीत जास्‍त नागरिकांनी देण्‍याचे आवाहन

0

भुसावळ (प्रतिनिधी) : येथील खडका रोड भागातील एक्‍सेल हाॅस्‍पीटल मध्‍ये आज दि.२१ जुलै मंगळवार रोजी कोवीड(कोरोना) १९ अंतर्गत रूग्‍ण तपासणी व स्‍वॅब नमुने संकलन शिबीराचे आयोजन उपविभागीय अधिकारी रामसिंग सुलाणे व उपजिल्‍हाधिकारी किरण सावंत पाटील यांच्‍या मार्गदर्शनाखाली करण्‍यात आले होते.

या शिबीरात सुमारे ६० रुग्णांचे स्‍वॅबचे नमुने संकलित करण्यात आले. या कामी नोडल अधिकारी म्हणुन अॅड.तृप्ती भामरे यांनी यशस्वी नियोजन केले.यावेळी मा.नगरसेवक हाजी आशिक खान,संजय बाणाईते,पंकज पन्‍हाळे,परवेज अहेमद,विशाल पाटील,अनिल भाकरे उपस्‍थित होते. एक्‍सेल हाॅस्‍पीटलचे डाॅ.एजाज खान,नगरपरिषद रूग्‍णालयाच्‍या परिचारीका सुरेखा तायडे,प्रशांत चौधरी,प्रयोगशाळा तंत्रज्ञ श्री.झईद,रोहीणी वारके यांचे सहकार्य लाभले.

डाॅ.एजाज खान व अॅड.तृप्‍ती भामरे यांनी शिबीराचा जास्‍तीत जास्‍त लाभ घेऊन स्‍वॅबचे नमुने देण्‍याचे आवाहन नागरिकांना केले.

Leave A Reply

Your email address will not be published.