अमळनेर तालुक्यात भरीव पीकविमा मंजूर झाल्याने शेतकऱ्यांनी आमदारांचा केला सत्कार

0

अमळनेर (प्रतिनिधी):- तालुक्यातील 10 मंडळातील शेतकऱ्यांना 63.86 कोटी रुपये पीक विमा आमदार अनिल पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे मंजूर झाल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांनी त्यांचा सत्कार केला.

तालुक्यातील 8 मंडळातील 25 हजार 125 शेतकऱ्यांना सुमारे 53 कोटी 76 लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे.
तालुक्यातील सुमारे 24 हजार 573 हेक्टर वरील शेतीवरील पीक विमा मंजूर झाला आहे.तालुक्यात सतत अवर्षणप्रवण व अतिवृष्टीमुळे संकटात असलेल्या शेतकऱ्यांना उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषिमंत्री दादा भुसे, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या प्रयत्नाने ही रक्कम मिळाली असून आमदार अनिल पाटील यांनी मतदारसंघातील शेतकऱ्यांना गेल्या वर्षी बसलेला फटका व व चार वर्षे सहन केलेला दुष्काळ यात मोठा दिलासा मिळाला असल्याने शेतकऱ्यांनी आमदार अनिल पाटील यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे आभार मानले.

यावेळी दिनेश पाटील सरपंच पिंपळे खु, डिंगबर पाटील सरपंच गलवाडे, सुभाष पारधी सरपंच पिंपळे बु, सुनिल पाटील सरपंच निंभोरा, अशोक पाटील सरपंच भरवस, विकास पाटील सरपंच पळासदडे, जितेंद्र पाटील माजी सरपंच फापोरे, रामकृष्ण पाटील सरपंच तरवाडे, भैय्यासाहेब पाटील सरपंच बाह्मणे, कैलास पाटील सरपंच लोण खु, जयदीप पाटील,नितीन पाटील, किरण पाटील, रमेश मिस्त्रि खडके, सुनील पवार, सुरेश पाटील आदी शेतकरी यावेळी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.