स्वस्त धान्य दुकान परवाना प्रकरणी आमडदे ग्रामस्थांचे भडगाव तहसील कार्यालय समोर आमरण उपोषण

0

भडगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील आमडदे येथील स्वस्त धान्य दुकान (रेशन दुकान) परवाना गैर प्रकार प्रकरणी दि.१७-८-२०२० रोजी ग्रामस्थांनी लेखी तक्रार प्रशासनाकडे केली होती. या तक्रारीची कुठलीही दाखल घेतली नाही म्हणून आज भडगाव तहसील कार्यालय समोर आमडदे ग्रामस्थ आमरण उपोषणाला बसले आहे.

या बाबत अधिक असे की, आमडदे गावातील स्वस्त धान्य दुकान बाबत जिल्हाधिकारी जळगाव, तहसिलदार भडगाव, यांच्याकडे वेळोवेळी लेखी तक्रार करून कुठलीही दाखल घेतली नाही म्हणून आमडदे येथील शेखर पाटील, तुकाराम पाटील, नाना पाटील, सौ. शालिनी पाटील, सौ. मिना पाटील हे ग्रामस्थ उपोषणाला बसले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.