स्थायी व महिला बालकल्याण कल्याण समिती सदस्यांची निवड !

0

जळगाव (प्रतिनिधी) :  स्थायी समिती व महिला बालकल्याण समितीच्या सदस्यांच्या नेमणुकीसाठी आज दि. 25 रोजी महापालिकेत महापौर सिमा सुरेश भोळे यांच्या अध्यक्षतेखाली महासभा पार पडली. यावेळी व्यासपीठावर उपमहापौर डॉ. अश्विन सोनवणे, उपायुक्त अजित मुठे, नगरसचिव सुनील गोराणे उपस्थित होते. पक्षीय बलाबलानुसार भाजपा शिवसेना व एमआयएमचे सदस्यांची नावे बंद पाकिटात महापौरांपुढे सादर करण्यात आले.  यावेळी स्थायी सभेच्या १६ पैकी ८ सदस्य निवृत्त झाले असून नवीन आठ सदस्यांची निवड करण्यात आली.

स्थायी समितीच्या नवीन सदस्यांसह  

सुचिता हाडा (भाजप), दिलीप पोकळे (भाजप), प्रवीण कोल्हे (भाजप), सुनील खडके (भाजप), चेतन संनकत (भाजप), भगतराम बालानी (भाजप), सदाशिव ढेकळे (भाजप), नवनाथ दारकुंडे (भाजप), मुकुंद सोनवणे (भाजप), राजेंद्र पाटील (भाजप), प्रतिभा देशमुख (भाजप), रेशमा काळे (भाजप),  विष्णू भंगाळे(शिवसेना), नितीन लढ्ढा(शिवसेना), नितीन बरडे (शिवसेना), सईदाबी शेख (एम.आय.एम.) यांची निवड करण्यात आली असून नितीन लढ्ढा व नितीन बरडे यांची पुन्हा निवड झाली आहे.

महिला बालकल्याण समितीचे सदस्य

कांचन सोनवणे (भाजपा), गायत्री शिंदे (भाजपा), मीना सपकाळे (भाजपा), शोभा बारी (भाजपा), चेतना चौधरी (भाजपा), शेख हासीनाबी शरीफ (भाजपा), मीनाक्षी पाटील (भाजपा), शबानाबी सादीक (शिवसेना) जिजाबाई भापसे (शिवसेना) यांची निवड झाली.

Leave A Reply

Your email address will not be published.