सोन्याच्या भावात वाढ ; तपासा आजचे नवे दर

0

मुंबई : मागील काही दिवसापासून सोने चांदीच्या भावात चढ उतार पाहायला मिळत आहे. आज गुरुवारी सोन्याच्या किंमतीत वाढ झाली आहे. एमसीएक्सवर जून डिलिव्हरीसाठीच्या सोन्याचा दर सकाळी 10.21 वाजता 116 रुपयांच्या वाढीसह 47209 च्या पातळीवर व्यापार करत होता.

बुधवारी हा दर 47093 च्या पातळीवर बंद झाला होता आणि आज 47245 रुपयांच्या पातळीवर उघडला. 47299 रुपये प्रति दहा ग्रॅम ही आतापर्यंतची सर्वोच्च पातळी आहे आणि 47205 रुपये हा सर्वात कमी दर आहे. ऑगस्ट डिलिव्हरीसाठीच्या सोन्याचा भाव 100 रुपयांनी वाढून 47492 रुपयांच्या पातळीवर व्यापार करत आहे.

डॉलरच्या तुलनेत एमसीएक्सवर जुलै डिलिव्हरीसाठीच्या चांदीची किंमत 627 रुपयांच्या तेजीसह 69670 रुपयांवर होती. त्याचप्रमाणे मे डिलिव्हरीसाठीच्या चांदीचा दर 664 रुपयांनी वाढून 68450 रुपये प्रतिकिलो होता. 10 वर्षाच्या यूएस बाँड यील्डमध्येही आज घसरण दिसून येत आहे. सध्या हे प्रमाण 1.61 टक्के आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारामध्येही सोन्याच्या किंमतीत वाढ दिसून येत आहे. जून डिलिव्हरीसाठीच्या सोन्याचे भाव यावेळी 11.15 डॉलर (+ 0.63%)च्या तेजीसह 1785.05 डॉलर प्रति औंसवर व्यापार करत होता. यावेळी चांदीच्या वितरणातही तेजी दिसून येत आहे. यावेळी चांदीचा दर 0.335 डॉलर (+1.28%)च्या वाढीसह 26.420 डॉलर प्रति औंसवर ट्रेड करत होता. एका औंसमध्ये 28.34 ग्रॅम असतात.

 

Leave A Reply

Your email address will not be published.