सोन्याच्या भावात घसरण ; जाणून घ्या जळगावमधील प्रतितोळ्याचा भाव

0

मुंबई : अर्थसंकल्पात केंद्र सरकारने सोन्यावरील आयात शुल्कात कपात करण्याचा निर्णय घेतल्यानंतर सोन्याच्या भावांमध्ये घसरण होत असल्याचं दिसून आलं. आजही राज्यात सोन्याच्या किंमती घसरल्याचं पहायला मिळालं. आज जळगावमध्ये सोन्याचा भाव 48 हजार 200 प्रतितोळा आहे तर अवघ्या 9 दिवसांमध्ये सोन्याचे भाव कमीच झाल्याचं समोर आलं आहे. कारण, जानेवारीच्या शेवटच्या तारखेला म्हणजे 31 जानेवारीला सोन्याचा भाव 50 हजार 703 प्रतितोळा होता.

 

आज मुंबईतही सोन्याचे भाव घसरले आहेत. मुंबईत 31 जानेवारीला 46 हजार 744 रुपये प्रतितोळा सोन्याची किंमत होती तर आज मात्र सोन्याच्या किंमती घसरून 45 हजार 21 रुपये प्रतितोळ्यावर पोहोचल्या आहेत. आठवड्याच्या सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या भावामध्ये घसरण पाहायला मिळाली आहे. सोमवारी मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्याचा वायदा भाव किंमत 0.13 टक्क्यांनी घसरला होती. ही 6 सत्रात पाचवी घसरण असल्याची माहिती देण्यात आली. इतकंच नाहीतर चांदीच्या किंमतीतही 0.2 टक्क्यांची घसरण झाली होती. त्यामुळे सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे.

 

सोमवारी मल्टी कमोडिटी एक्सचेंज (एमसीएक्स) वर फेब्रुवारीमधील सोन्याचा वायदा भाव 0.13 टक्क्यांनी घसरून 47,195 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला होता तर एक किलो चांदीची किंमत 0.28 टक्क्यांनी घसरून 68,593 रुपये झाली.

 

इतर शहरांमधील भाव

जळगाव

31 जानेवारी : 50 हजार 703 प्रतितोळा

9 फेब्रुवारी : 48 हजार 200 प्रतितोळा

 

मुंबई

31 जानेवारी- 46 हजार 744 रुपये प्रतितोळा

आज – 45 हजार 21 रुपये प्रती तोळा

 

पुणे

31 जानेवारी : 49 हजार 600 प्रतितोळा

9 फेब्रुवारी : 48 हजार 900 प्रतितोळा

 

औरंगाबाद

31 जानेवारी : 48 हजार 980 प्रतितोळा

9 फेब्रुवारी : 47 हजार 512 प्रतितोळा

 

कोल्हापूर

31 जानेवारी : 50 हजार 700 प्रतितोळा

9 फेब्रुवारी : 48 हजार 900 प्रतितोळा

 

नागपूर

31 जानेवारी : 49 हजार 100 प्रतितोळा

9 फेब्रुवारी : 49 हजार 50 प्रति तोळा

 

नाशिक

31 जानेवारी : 50,500 प्रतितोळा

9 फेब्रुवारी : 48,800 प्रतितोळा

 

सोलापूर

31 जानेवारी : 49 हजार 760 रुपये प्रतितोळा

9 फेब्रुवारी : 48 हजार 360 रुपये प्रतितोळा

 

रत्नागिरी

31 जानेवारी : 49 हजार 770 प्रतितोळा

9 फेब्रुवारी : 48 हजार 760 प्रतितोळा

Leave A Reply

Your email address will not be published.