आरटीई प्रवेश प्रक्रिया आजपासून

0

जळगाव | शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (अारटीई) खासगी शाळांमध्ये राखीव २५ टक्के जागांवर आर्थिक व दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश दिला जातो. या अारटीई प्रवेशासाठी अाॅनलाइन प्रक्रिया राबवण्यात येते. शैक्षणिक वर्ष २०२१ व २०२२ या वर्षाकरिता अारटीई प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर झाले आहे.

९ फेब्रुवारीपासून पालकांना प्रवेशासाठी अर्ज दाखल करता येणार आहे. या वर्षासाठी नोंदणी झालेल्या पात्र शाळांची नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. ९ ते २४ फेब्रुवारी पालकांनी अर्ज भरणे, ५ ते ६ मार्च सोडत, ९ ते २६ मार्च लाॅटरीद्वारा निवडीची पडताळणी, २७ मार्च ते ६ एप्रिल प्रतीक्षा यादीचा प्रवेशाचा पहिला टप्पा, १२ ते १९ एप्रिल प्रतीक्षा यादीचा प्रवेशाचा दुसरा टप्पा, २६ एप्रिल ते ३ मे प्रतीक्षा यादीचा प्रवेशाचा तिसरा टप्पा, १० ते १५ मे प्रतीक्षा यादीचा प्रवेशाचा चौथा टप्पा असा प्रवेश प्रक्रियेचा कालावधी आहे. प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे लागणार अाहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.