सोने-चांदी पुन्हा महागली ; जाणून घ्या आजचे ताजे दर

0

नवी दिल्ली : भांडवली बाजारातील अनिश्चितता आणि करोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे सरकार पुन्हा कठोर निर्बंध लादण्याची शक्यता आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे. या पार्श्वभूमीवर सुरक्षित गुंतवणूक पर्यायाकडे गुंतवणूकदारांनी धाव घेतली आहे. सलग दोन सत्रात सोने ३०० रुपयांनी महागले आहे.

मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये सध्या सोन्याचा भाव ४७११८ रुपये असून त्यात २०० रुपयांची वाढ झाली आहे. आज चांदी ३६३ रुपयांनी महागली आहे. एक किलो चांदीचा भाव ६८२३६ रुपयांपर्यंत वाढला आहे. याआधी शुक्रवारी सोन्याचा भाव ४६९५६ रुपयांवर स्थिरावला होता. त्यात ८६ रुपयांची किरकोळ वाढ झाली. तत्पूर्वी सोन्याचा भाव ४६८३५ रुपयांपर्यंत खाली आला होता. एक किलो चांदीचा भाव ६७९०० रुपयांवर बंद झाला.त्यात १६७ रुपयांची वाढ झाली होती.

मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर गेल्या आठवड्यात सोन्याचा भाव ४६५०० रुपयांपर्यंत खाली गेला होता. १४ एप्रिलनंतर पहिल्यांदाच सोन्याचा दर अडीच महिन्यांतील निचांकी पातळीवर गेला होता. मात्र आता पुन्हा सोन्याने यु टर्न घेतला आहे.

Goodreturns या वेबसाईटनुसार आज सोमवारी मुंबईत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४६१७० रुपये आहे. मुंबईत २४ कॅरेटचा भाव ४७१७० रुपये आहे. दिल्लीत आजचा २२ कॅरेट सोन्याचा भाव ४६२७० रुपये झाला आहे. २४ कॅरेटसाठी सोन्याचा भाव ५०३२० रुपये आहे. आज चेन्नईत २२ कॅरेटसाठी ४४४६० रुपये तर २४ कॅरेट सोन्याचा भाव ४८५०० रुपये आहे. कोलकात्यात आज २२ कॅरेट सोन्याचा भाव ४६६८० रुपये असून २४ कॅरेट सोन्याचा भाव ४९२३० रुपये आहे.

स्पॉट गोल्डचा भाव १७७७ डॉलर प्रती औंस असून त्यात ०.२ टक्के घसरण झाली आहे. याआधी सोन्याचा भाव १७७० डॉलरपर्यंत खाली घसरला होता. चांदीचा भाव २६.०७ डॉलर आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.