लोहारा येथील तलाठी शेख यांचा भोंगळ कारभार

0

कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी कायदेशीर कारवाई करून निलंबित करण्याची मागणी…

पाचोरा (प्रतिनिधी) : लोहारा ता. पाचोरा येथील शेतकरी अशोक भगवान चौधरी गट. नंबर ९२३ क्षेत्र ०.३२ आर शिवार लोहारा येथील शेत जमिनीवर शेतकरी अशोक भगवान चौधरी यांनी शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान योजना अंतर्गत ऑनलाइन रीतसर दि. २० फेब्रुवारी २०१९ रोजी फार्म भरलेला होता त्यानंतर मला ०३ सप्टेंबर २०२० पहिला हप्ता रक्कम रुपये २ हजार मिळाले व नंतर एकही हप्ता मला मिळाला नाही त्यावेळेस बरेच दिवस मी तलाठी कार्यालयाचे उंबरठे गाठले मात्र तलाठी लोहारा नदीम शेख हे सतत मला तुमचे पैसे आज येईल उद्या येईल असे सांगून वेळ मारून देत होते व व्यवस्थित न बोलता मला तेथून हाकलून लावत असे काही दिवस गेल्यानंतर मी दि. २० मे २०२१ रोजी माझ्या मुलाकडून ऑनलाईन तपासले असता तलाठी लोहारा नदीम शेख यांनी मला मयत दाखवले आहे व तसा पी. एम. किसान पोर्टलवर रिमार्क करून मला कायमस्वरूपी शासनाच्या योजनेपासून वंचित ठेवले व ठेवत आहे.

याचा जाब विचारण्यासाठी मी त्याच दिवशी दि. २० मे २०२१ रोजी त्यांच्याकडे आधार कार्ड व बँक पासबुक घेऊन गेलो असता त्यावेळेस त्यांनी मला व्यवस्थित उत्तरे न देता मला अरे कारे भाषा वापरात तुम्ही मला एक हजार रुपये दिले होते का पैसे द्या तुमचे काम लगेच मी करून देतो असे म्हणत तेथून मला   कार्यालयाबाहेर काढले जा इथून पुन्हा येऊ नकोस तू पाचोरा तहसिलदार कडे जा तिथे तुला पैसे मिळतील मी काही तुझा नोकर नाही फुकट काम करायला असे माझ्यासोबत त्यांनी अशोभनीय कृत्य केले सदरील प्रकारामुळे मी पूर्णपणे भयभीत झालो.

मी जिवंत असताना त्यांनी मला मयत का दाखवले हा विचार करत मी तिथून निघून आलो नंतर मी तहसिलदार पाचोरा यांच्याकडे दि. २६ मे २०२१ व  जिल्हाधिकारी यांच्याकडे दि. २८ मे २०२१ रोजी लेखी तक्रार अर्ज दिलेत मात्र आज पर्यंत माझ्या अर्जावर कोणत्याही प्रकारे कार्यवाही झालेली नाही मागील काही महिन्यापूर्वी असेच प्रकरण मौजे कळमसरा येथील शेतकरी संतोष बोकारे यांना देखील तलाठी नदीम शेख यांनी मयत दाखवून लाभापासून वंचित ठेवले होते. अशी आप बीती शेतकरी अशोक भगवान चौधरी यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितली. लोहारा ता. पाचोरा येथील तलाठी नदीम शेख यांच्याबाबत अनेक गावातील शेतकरी नागरिक यांचे अर्ज वरिष्ठ पातळीवर पेंडिंग आहेत मात्र आज पावेतो रीतसर तलाठी शेख यांच्यावर तहसीलदार, जिल्हाधिकारी का कारवाई करत नाही ? हा प्रश्न गावातील नागरिकांना व शेतकर्‍यांना पडलेला आहे तरी अशोक भगवान चौधरी या अत्यंत गरीब शेतकऱ्याला लवकर न्याय मिळावा अन्यथा शेतकरी तहसिलदार, पाचोरा यांच्यासमोर उपोषणास बसण्यास तयार असल्याचे त्यांनी बोलून दाखवले. या प्रकारामुळे गावातील लोकांमध्ये चर्चेला उधान आले आहे. अशोक भगवान चौधरी हे तर जीवित आहेत तलाठी यांनी मयत दाखवले कसे ?

 

प्रतिक्रिया –

मला पहिला पी. एम. किसान योजनेचा लाभ मिळाला परंतु नंतर अचानक माझा योजनेचा लाभ बंद करण्यात आला असता. मी तलाठी कार्यालयात विचारपूस करण्यासाठी गेलो असता मला अरेरावीची भाषा, व मारण्याची धमकी देण्यात आली. तुला इंग्रजी वाचता येते का, चल जा बाहेर, पागल आहे तू,  व मला मी जिवंत असतांना मयत दाखविले आहे. असे गैर वर्तन त्यांनी माझ्याशी केले. मी तहसिलदार व जिल्हाधिकारी यांना पत्र पाठवले आहे. त्याचे अजून पर्यंत उत्तर मिळाले नाही तरी मला लवकरात लवकर न्याय देण्यात येऊन संबंधीतावर  योग्य ती कारवाई करण्यात यावी.

अशोक भगवान चौधरी  –

शेतकरी लोहारा

Leave A Reply

Your email address will not be published.