सोने आणि चांदीच्या भावात घसरण ; जाणून घ्या आजचा भाव

0

मुंबई : सोन्यातील मधील तेजीला शुक्रवारी ब्रेक लागला आहे. शुक्रवारी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये सोने दरात घसरण झाली. तर चांदीचा भाव वधारला होता. मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये शुक्रवारी सोन्याचा भाव प्रती १० ग्रॅम ४९३०२ रुपयांवर बंद झाला. त्यात ९३ रुपयांची किरकोळ घसरण झाली.

जगभरात कोरोना विषाणूच्या रुग्णात वाढ आणि अनेक देशांमध्ये नवे लॉकडाऊन लागल्याने गुंतवणुकदारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. यासोबतच जागतिक मध्यवर्ती बँकांच्या आधारामुळे सोन्याच्या दरांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

goodreturns या वेबसाईटनुसार आज शनिवारी मुंबईत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४८३३० रुपये आहे. तर २४ कॅरेटचा भाव ४९३३० रुपये आहे. दिल्लीत २२ कॅरेटचा भाव ४८०५० रुपये असून २४ कॅरेटचा भाव ५२६४० रुपये आहे. दिल्लीत २२ कॅरेट सोने २०० रुपयांनी स्वस्त झाले आहे. कोलकात्यात २२ कॅरेटसाठी ग्राहकांना ४७५३० रुपये मोजावे लागतील. तर २४ कॅरेटचा भाव ५०६३० रुपये आहे. चेन्नईत २२ कॅरेटचा सोन्याचा दर ४६५२० रुपये असून २४ कॅरेटसाठी ५०७५० रुपये आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.