पाळधी येथील धर्मांधांना अटक करा ; भाजपाचे तहसीलदारांना निवेदन

0

पाळधी ता.धरणगाव :  येथे धर्मांधांनी ग्रामपंचायत कार्यालयात हिंदू महिलांवर अत्याचार करणारा,मंदिरांना उध्वस्त करणारा,हिंदू धर्मावर आघात करणारा टिपू सुलतानचा फोटो बळजबरीने लावला.

पाळधी ग्रामपंचायतीत कोणतीही परवानगी न घेता टिपू सुलतानचा फोटो कोणाच्या वरद हस्तामुळे या धर्मांधांनी लावला? ग्रामसेवकास अर्वाच्य भाषेत शिवीगाळ कोणाच्या दमावर केली? पोलिसांनी कोणाच्या दबावाखाली फोटोला कागद चिटकवून पुन्हा कार्यालयात लावले?

वरील घटनेचा भारतीय जनता पार्टी धरणगाव तालुक्याच्या वतीने आम्ही जाहीर निषेध करत जाहीर निवेदन देतो की पाळधी ग्रामपंचायत कार्यालयात कोणतीही पूर्वकल्पना न देता,कोणतेही शासकीय परीपत्रक नसतांना,कुठलाही ठराव नसतांना.ग्रामपंचायत कार्यालयात फोटो लावून सोशल मीडियावर कार्यालयातील फोटो व्हायरल केले.ग्रामसेवकास शिवीगाळ केली म्हणून सदरील व्यक्तीवर गुन्हे दाखल करून अटक करण्यात यावी अन्यथा भारतीय जनता पार्टीच्या वतीने सनदशीर मार्गाने आंदोलन केले जाईल.त्याप्रसंगी जिल्हाउपाध्यक्ष पी सी आबा पाटील,शिरीषआप्पा बयस,प्रकाशदादा सोनवणे,शेखरदादा पाटील, तालुकाध्यक्ष जिजाबराव पाटील,शहराध्यक्ष दिलीप महाजन,अँड.वसंतराव भोलाने, गटनेते कैलास माळी सर,मधुकर रोकडे,नगरसेवक ललित येवले,गुलाब मराठे,सुनील चौधरी, अँड.संदीप पाटील,युवा मोर्चा अध्यक्ष भूषण धनगर,शरद भोई,सचिन पाटील,जितेंद्र महाजन,रवी पाटील,जितु चौधरी,विक्की महाजन,इत्यादी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.