सुशांतसिंह आत्महत्या प्रकरण : ईडीने रियाच्या वडिलांचा आणि भावाचा मोबाईल-लॅपटॉप केला जप्त

0

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणात अभिनेत्री रिया चक्रवर्तीनंतर तिच्या वडिलांची आणि भावाची सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) चौकशी केली. या चौकशीनंतर ईडीने रियाचे वडील इंद्रजीत चक्रवर्ती आणि भाऊ शोविक यांचे मोबाईल फोन आणि लॅपटॉप जप्त केले आहेत. तसंच रियावर मनी लॉड्रिंग म्हणजे आर्थिक अनियमितता प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्यामुळे तिचेदेखील दोन मोबाईल जप्त करण्यात आले आहेत, असं ‘टाईम्स नाऊ’च्या वृत्तात नमूद करण्यात आलं आहे.

ईडीने सोमवारी रिया आणि तिच्या कुटुंबीयांची कसून चौकशी केली. मात्र या चौकशीदरम्यान इंद्रजीत चक्रवर्ती आणि शोविक यांनी सहकार्य न केल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांनी रिया आणि शोविक या दोघांचे आयपॅड, मोबाइल आणि इंद्रजीत यांचा लॅपटॉप जप्त केला आहे.

रियाने ती दुसरा मोबाइल वापरत असल्याबद्दलची माहिती लपवून ठेवली होती. तिचा भाऊ व वडिलांच्या जबाबातून ही बाब समोर आली. त्यामुळे अधिकाºयांनी तिचा भाऊ शोविकला घरातून मोबाइल घेऊन आणण्यास लावले. रिया आणि तिच्या कुटुंबीयांनी ईडीच्या बºयाच प्रश्नांची उत्तरे दिली नाहीत.

रियाचे उत्पन्न आणि खर्च यात मोठा फरक असल्याचे इन्कम टॅक्स रिटर्नमधून स्पष्ट झाले आहे. मालमत्तेबद्दल कोणतीही समाधानकारक माहिती तिने दिलेली नाही. त्यामुळे मोबाइल आणि लॅपटॉप जप्त केला असून त्याच्या तपासणीतून अनेक तपशील स्पष्ट होतील, असे ईडीच्या अधिकाºयांनी सांगितले.

सिद्धार्थ, श्रुतीचीही कसून चौकशी दरम्यान, सुशांतसिंहचा रूम पार्टनर सिद्धार्थ पिठानी, माजी व्यवस्थापक श्रुती मोदी यांचीही ईडीने कसून चौकशी केली. त्यांची आर्थिक उलाढाल, त्यांनी सुशांतकडून घेतलेल्या रकमेबद्दल तपशील घेण्यात आला असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.