सुने सुने वाळवंटात मुक्ताईचे चंद्रभागा स्नान

0

मुक्ताईनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क 

सकळ तीर्थ माध्यान्ह काळी ! येती पुंडलीका जवळी! करिती आंघोळी ! वंदीती चरण!!

आदिशक्ती मुक्ताबाई पालखी सध्या माहेरात अर्थात पंढरीत मुक्कामास असुन काल  द्वादशीला दुपारी निर्मनुष्य  भीमेच्या सुने सुने वाळवंटात  मोजक्या वारकरी उपस्थितीत  चंद्रभागा स्नान पार पडले.

एरव्ही लाखो भाविकांनी चंद्रभागा वाळवंट भक्तीरसात गजबजलेले असते.  मात्र यावेळी आई मुक्ताबाईने अगदी शुकशुकाट असलेल्या सुन्या सुन्या वाळवंटात भक्त पुंडलिकराय मंदीरासमोरील  लोहदंड तिर्थावर द्वादशीला दुपारी ११ वाजता स्नान करून परंपरा कायम राखली. पादुकांचे पूजन व आरती  करण्यात आली.

यावेळी संस्थानचे अध्यक्ष भैय्यासाहेब रविंद्र पाटील, विश्वस्त शंकर पाटील, निळकंठ पाटील, पंजाबराव पाटील, पालखी सोहळा प्रमुख रविंद्र महाराज हरणे, नायब तहसीलदार प्रदिप झांबरे, उध्दव जुनारे महाराज, नरेंद्र नारखेडे, सम्राट पाटील, ज्ञानेश्वर हरणे, विशाल महाराज खोले, महंत समाधान महाराज भोजेकर, ज्ञानेश्वर महाराज पाळधीकर, महंत नितीन महाराज, पंकज महाराज पाटील व वारकरी उपस्थित होते.

आज सकाळी ह.भ.प. लक्ष्मण महाराज वाघोदे तर संध्याकाळी महंत संजीवदास महाराज यांचे कीर्तन पार पडले. मुक्ताबाई मठात वारकऱ्यांनी  पावली फुगडीचा मनमुराद आनंद घेतला. सुकळी ग्रामस्थांनी नैवेद्याची सेवा दिली

Leave A Reply

Your email address will not be published.