सावखेडा येथील भैरवनाथ यात्रेला प्रारंभ : भाविकांची मांदियाळी

0
  पाचोरा  प्रतिनिधी
     पाचोरा तालुक्यातील सावखेडा येथे श्री. भैरवनाथ महाराजांची यात्रा दरवर्षी पौष महिन्याच्या प्रत्येक रविवारी भरत असते. यावर्षी २९ डिसेंबर २०१९ वार – रविवार  (पौष शु. १) पासुन प्रारंभ झाला. श्री. क्षेत्र भैरवनाथ संस्थान हे स्थान पाचोरा तालुक्यातील पाचोरा – जामनेर रोडवर असलेल्या वरखेडी गावापासून दिड कि.मी. अंतरावर बहुळा – खडकाळी संगमावर आहे. हे क्षेत्र सर्व धर्म समभावाचे प्रतिक आहे. भैरवनाथाच्या दर्शनासाठी हिंदु, मुसलमान, शिख, माळी, तेली, तांबोळी तसेच सर्व धर्मांचे सर्व जातींचे वेगवेगळ्या प्रांतातील भाविकांनी दि. २९ रोजी सकाळ पासुनच रांगा लावून दर्शनाचा लाभ घेतला. विविध गावांतील भाविकांनी बोललेला नवसही फेडला. यात्रेत खेळण्यांची, संसारोपयोगी वस्तुंची, फरसाण व मिठाईची दुकाने थाटण्यात येवुन लाखो रुपयांची उलाढाल झाली. यावेळी पिंपळगाव (हरे.) पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
        प्रत्येक देवतेला भैरव म्हणजे अंगरक्षक असतो. पण काही देवतेला दैत्य कुलीन असतो व काही देवतेला देव कुलीन असतो. त्यातील भैरवनाथ देव कुलीन या पुण्यवान नगराच्या व बहुळा – उतावळी व खडकाळी तीन नद्यांच्या संगमावर धरतीकाळ भैरवनाथ देवता प्रगट झालेले आहेत. यावर्षी २९ डिसेंबर २०१९, ५ जानेवारी २०२०, १२ जानेवारी २०२०, व १९ जानेवारी २०२० या चार रविवारी यात्रा भरणार आहे. श्री क्षेत्र भैरवनाथ महाराजांचे मंदिरात दररोज पहाटे ४ वाजता देवाला स्नान, ६ वाजता आरती, दुपारी १२ वाजता नैवेद्य आरती, सायंकाळी ५ वाजता देवाला स्नान, ६ वाजता नैवेद्य दिला जातो. व पौष महिन्यात भाविकांसाठी रोज रात्री पुरान, भागवत कथा, रामकथा, हरि किर्तनाचे आयोजन करण्यात येते.

Leave A Reply

Your email address will not be published.