बहिणाबाई महोत्सवाचे जानेवारीत

0
जळगाव दि २९-  शहरात भरारी फाऊंडेशनतर्फे दि. १७ ते २१ जानेवारी २०२० दरम्यान बहिणाबाई महोत्सवाचे आयोजन सागर पार्क मौदानावर करण्यात आले आहे. महोत्सावाचे हे सहावे वर्ष असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.यावेळी  भरारी फाऊंडेशनचे अध्यक्ष दीपक परदेशी, उद्योजक रजनीकांत कोठारी, जयदीप पाटील, विनोद ढगे आदी उपस्थित होते. महोत्सवाविषयी माहिती देताना दीपक परदेशी म्हणाले की, दि. १७ रोजी सायंकाळी ५:३० वाजता महोत्सवाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. या महोत्सवात  एकूण २६६ बचत गटांचा समावेश असून त्यातील २०० स्टॉल हे जळगाव जिल्हातील बचत गटाचे असून ६६ स्टॉल हे विविध जिल्ह्यातील आहे. यंदाच्या महोत्सवात प्रवेशद्वार हे ४० फुटाचा बहिणाबाई चौधरी यांचा चष्मा असून चित्रकार योगेश सुतार हे याचे चित्र साकारणार आहे. यासह महोत्सवात खाद्य महोत्सव, संस्कृतिक कार्यक्रम, विविध क्षेत्रात काम करणाऱ्या १० व्यक्तींचा विषेश सन्मान आदी कार्यक्रम होणार आहे. महोत्सवाचे हे ६ वे वर्ष असून गेल्या ५ वर्षात महिला बचत गटांची ४ कोटी ४५ लाखांची उलाढाल या महोत्सवाच्या माध्यमातून झाली असून महिला बचत गटांच्या सक्षमिकरणासाठी हा महोत्सव महत्वाचा ठरत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.तसेच सुप्रसिद्ध भारूड लोककलावंत साहित्य अकादमी पुरस्कार कलावंत चंदा तिवाडी यांचा रंगू भारुडयाचा कार्यक्रम ह.भ.प हमीद सैय्यद हे महाराष्ट्राची लोकसंस्कृती सांगणारा कार्यक्रम सादर करणार आहे.
यासोबतच फॅशन शो आयोजन अर्चना जाधव यांच्यावतीने सादरीकरण केले जाणार आहे. तसेच यामहोत्सवात खान्देशातील विविध खाद्य पदार्थ शैला चौधरी यांच्यामार्फत  बचतगटातील महिलांसाठी व या महोत्सवाला भेट देणाऱ्यांना शिकवणार आहे

Leave A Reply

Your email address will not be published.