सामनेर येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत दोन महिला जागीच ठार

0

मॉर्निंग वॉक जाताना घटना
पाचोरा  (प्रतिनिधी) तााालुक्यातील सामनेर येथे आज सकाळी ५ ते ५:३० वाजेच्या दरम्यान महात्मा गांधी माध्यमिक विद्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर अज्ञात वाहनाच्या धडकेने मॉर्निंग वाक करत असताना अज्ञात वाहनाने मागून जोरदार धडक दिल्याने दोन महिला जागीच ठार झाल्याची घटना दुर्देवी घडली.

घटनेबाबत सविस्तर वृत्त असे की, सामनेर ता. पाचोरा येथील महिला नेहमीप्रमाणे सकाळी मॉर्निंग वॉकसाठी सामनेर ते लासगाव दरम्यान रोज पुरुष व महिला सकाळी मॉर्निंग साठी जात असतात यावेळी सकाळी पाच ते साडे पाचच्या दरम्यान मनिषा साहेबराव पाटील (वय – ५०) अनिता शहादु पाटील (वय – ४८) या दोघी महिला मॉर्निंग वॉक करून परत असतांना अज्ञात इनोव्हा कारने जोरदार धडक दिल्याने दोघी महिला जागीच गतप्राण झाल्या अपघात एवढा जोरदार होता की एक महिला रस्त्याच्या बाजूला फेकल्या गेल्या तर दुसरी महिलेस ५० मीटर फरफटत नेले दोघी महिलांना पाचोरा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन साठी दाखल करण्यात आले. असता वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित साळुंखे यांनी त्यांना मृत घोषित केले. घटनास्थळी पाचोरा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक राहुल मोरे ,पोलिस हवालदार रामदास चौधरी, पुढील तपास करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.