सातपुड्याच्या पायथ्याशी असणारे श्री मनुदेवी मंदिर वन प्रवेशद्वारात लॉकडाऊनची पायमल्ली

0

धानोरा , प्रतिनीधी विलास सोनवणे

संपूर्ण खानदेशातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेले तसेच यावल तालुक्यातील श्री मनुदेवी मंदिर वन प्रवेशद्वारात लॉकडाऊन संदर्भात सर्व नियमांची पायमल्ली केली जात असल्याची ई-मेल द्वारे तक्रार श्री मनुदेवी मंदिर चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव संत श्री बाबा महाहंसजी महाराज यांनी केली आहे.

19 जुलै  सोमवार रोजी तहसीलदार यावल, जिल्हाधिकारी जळगाव,पोलीस अधीक्षक जळगाव,उपविभागीय अधिकारी फैजपुर,पोलीस निरीक्षक यावल यांना दिलेल्या तक्रार अर्जात संत श्री बाबा महाहंसजी महाराज यांनी म्हटले आहे की,यावल तालुक्यातील सुप्रसिद्ध श्री मनुदेवी मंदिर आडगावच्या श्री मनुदेवी मंदिर वन प्रवेशद्वारावर वन विभागाचा कोणीही अधिकृत नियुक्त कर्मचारी नसताना निलंबित पोलीस पाटील तथा सातपुडा निवासिनी ट्रस्टचे अध्यक्ष शांताराम राजाराम पाटील यांचे सहकाऱ्यांनी उभे राहून स्वतःला मनुदेवी मंदीराचे अधिकृत असल्याचे सांगून व भासवुन मनुदेवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची दिशाभूल करून दि, 18 जुलै2021रविवार रोजी बेकायदेशीरपणे व प्रवेशद्वाराचे सर्व सूत्रे हातात घेऊन मोठ्या प्रमाणात टू व्हीलर,थ्री व्हीलर व फोर व्हीलर वाहनांना प्रवेश देवून मनुदेवी मंदिर परिसरात शेकडो लोकांची गर्दी वाढवून जिल्हाधिकारी साहेब जळगाव यांचे कोरोना संक्रमण सर्व निर्बंधांची पायमल्ली केल्याचे परिसरात चर्चिले जात आहे,सदर अनधिकृत इसम भाविकांकडून गुपित मार्गाने दूरध्वनीवरून संपर्क साधून पुंजीपत्री वसुली करून वाहनांना प्रवेश देतात.

 

अशाप्रकारे लॉकडाऊनचा गैरफायदा घेऊन बऱ्याच दिवसापासून धंदा सुरू असल्याचे चर्चिले जात आहे,त्यामुळेच श्री मनुदेवी वन प्रवेश नाक्यावर अशाप्रकारे वाहनांची गर्दी होते अन्यथा महाराष्ट्र शासनाची व जिल्हाधिकारी जळगाव यांचे लॉकडाऊनचे निर्बंध/आदेश लागू असताना व त्याची प्रसार माध्यमातून प्रसिद्धी झालेली असताना भाविक/भक्त श्री मनुदेवीच्या दर्शनाला येण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.

सदर गर्दीला आमंत्रित करण्याचे एकमेव कारण आहे श्री मनुदेवी मंदिराचे अनधिकृतपणे अध्यक्ष व प्रशासक सांगणारे आडगाव येथील निलंबित पोलीस पाटील शांताराम राजाराम पाटील यांचे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष हिमतीवर पाठबळावर त्यांचे सहकाऱ्यांनी अनधिकृत व बेकायदेशीरपणे चालविलेला गैरफायदा व धंदा आहे!या धंद्यातून वन विभागाचे काही कर्मचारी सुद्धा आपला आर्थिक हेतू साध्य करत असतील, म्हणून त्यांनी सदर प्रवेश द्वारावर मोकळीक सोडलेली असावी.

याकडे वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे सुद्धा दुर्लक्ष होत आहे अन्यथा वन विभागाच्या अधिकारी कर्मचारी यांनी या ठिकाणी गैरप्रकारावर कानाडोळा केलाच नसता याकडे वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे सुद्धा दुर्लक्ष होत आहे तरी या गंभीर स्वरूपाच्या हालचालीची तात्काळ दखल घ्यावी अशी मागणी श्री मनुदेवी मंदिर चँरीटेबल ट्रस्टचे सचिव संत श्री बाबा महाहंसजी महाराज यांनी केली आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.