साखरपुड्याच्या दोन तास अगोदर इंजिनिअर युवकाचा ह्रदय विकाराने मृत्यू

0
पाचोरा (प्रतिनिधी) : येथील कृष्णाजी नगर येथे राहत असलेल्या २८ वर्षीय युवकाचा साखरपुड्याची तयारी सुरू असतांना अचानक छातीत दुखु लागल्याने त्यास खाजगी रुग्णालयात उपचारासाठी नेले असता अचानक हृदय विकाराचा तिव्र झटका आल्याने त्याची प्राण ज्योत मालवली.
पाचोरा येथील प्रगतीशील शेतकरी सुरेश (बंडु नाना) लक्ष्मण येवले यांचा मुलगा गेल्या दोन वर्षांपासून नाशिक येथील खाजगी कंपनीत इंजिनिअर असलेल्या सौरभ सुरेश येवले याचा दि. १२ रोजी दुपारी एक वाजता नाशिक येथील खाजगी कंपनीत इंजिनिअर म्हणुन सेवेत असलेल्या युवतीशी विवाह ठरल्याने साखरपुडा आयोजित केला होता. मात्र साखरपुड्याचे दोन तास अगोदरच अचानक छातीत कळ आल्याने त्यास येथील खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. उपचारा दरम्यान हृदय विकाराचा तिव्र झटका आल्याने त्याचा मृत्यू झाला. सौरभ येवले हा आई – वडिलांना एकुलता एक मुलगा असुन त्याचा विवाह ३१ जानेवारी २०२० रोजी होणार होता. मात्र काळाने झडप घालून साखरपुड्याच्या दिवशीच त्याचा अंत झाल्याने संपूर्ण पाचोरा शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत होती. मयताचे शवविच्छेदन ग्रामिण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित साळुंखे यांनी केले. सौरभ याचे पाश्र्चात्य आई, वडिल व एक इंजिनिअर क्षेत्रात पदवी झालेली एक बहिण आहे. त्याचेवर दि. १२ रोजी सायंकाळी करण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.