सलग सातव्या दिवशी इंधन दरात वाढ ; जाणून घ्या आजचा दर

0

मुंबई : पेट्रोलियम कंपन्यांनी सलग सातव्या दिवशी इंधन दरात वाढ केली आहे. आज सोमवारी देशभरात पेट्रोल २९ पैसे तर डिझेल ३२ पैशानी महागले आहे. यामुळे ग्राहकांच्या खिशाला झळ बसत असून कंपन्या मात्र जोरदार कमाई करत आहे. इंधन दरवाढीवरून केंद्र सरकारवर चोहोबाजूने टीका होत आहे.

 

आजच्या दरवाढीनंतर मुंबईत पेट्रोलचा भाव ९५.४६ रुपये झाला आहे. मुंबईत एक लीटर डिझेलसाठी ग्राहकांना आता ८६.३४ रुपये मोजावे लागतील. राज्यात परभणीमध्ये पॉवर पेट्रोलचा भाव १००.१६ रुपये झाला आहे. तर साध पेट्रोल सर्वाधिक ९७.४५ रुपये आहे. परभणीत एक लिटर डिझेलचा भाव ८६.९५ रुपये आहे.

 

दिल्लीत आज एक लीटर पेट्रोल ८८.९९ रुपये झाले आहे. डिझेलचा भाव ७९.३५ रुपये झाला आहे. चेन्नईत आजचा पेट्रोलचा भाव ९१.१९ रुपये झाला आहे. डिझेलसाठी ८४.४४ रुपये भाव आहे. कोलकात्यात आज पेट्रोल ९०.२५ रुपये झाले आहे. डिझेलचा भाव ८२.९४ रुपये झाला आहे.बंगळुरात पेट्रोल ९१.९७ रुपये असून डिझेल ८४.१२ रुपये झाला आहे.

 

गेल्या दहा महिन्यात पेट्रोल आणि डिझेलमध्ये मोठी दरवाढ झाली आहे. यामुळे ग्राहकांचे कंबरडे मोडले आहे. जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींनी वर्षभराचा उच्चांकी स्तर गाठला आहे. आज ब्रेंट क्रूडचा भाव ६३.२३ डॉलर असून त्यात ०.८० डॉलरची वाढ झाली. तर सिंगापूर क्रूड ऑइल एक्सचेंजमध्ये कच्च्या तेलाचा भाव १ डॉलरने वधारला आणि ६०.४७ डॉलर झाला.

Leave A Reply

Your email address will not be published.