सलग चौथ्या दिवशी महाग ; जाणून घ्या आजचा दर

0

मुंबई : सराफा बाजारातील तेजीचा सिलसिला आज कायम आहे. सध्या मल्टी कमॉडिटी बाजारात सोने आणि चांदीच्या दरात वाढ झाली आहे. सोन्याचा भाव सकाळी ०.२ टक्क्यांनी वधारला आणि तो प्रती १० ग्रॅम ४९३८० रुपयांवर गेला होता. चांदीमध्ये ०.२ टक्क्यांची वाढ झाली आणि एक किलोचा भाव ६३७६७ रुपयांवर गेला होता.

करोना प्रतिबंधात्मक लशीच्या उत्पादनाला वेग आला आहे. यामुळे करोना साथीला अटकाव घालणे शक्य होणार आहे. दरम्यान, या घडामोडींनी सोने आणि चांदीच्या किमतीवर परिणाम केला. गेल्या महिन्यात या मौल्यवान धातूंमध्ये नफा वसुली झाली होती. यामुळे सोन्याचा भाव ४८ हजारांखाली आला होता. मात्र सोन्याने या घसरणीची भरपाई केली आहे.

goodreturns या वेबसाईटनुसार आज शुक्रवारी मुंबईत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४८३३० रुपये आहे. तर २४ कॅरेटचा भाव ४९३३० रुपये आहे. दिल्लीत २२ कॅरेटचा भाव ४८२५० रुपये असून २४ कॅरेटचा भाव ५२६३० रुपये आहे. कोलकात्यात २२ कॅरेटसाठी ग्राहकांना ४७५२० रुपये मोजावे लागतील. तर २४ कॅरेटचा भाव ५०६२० रुपये आहे. चेन्नईत २२ कॅरेटचा सोन्याचा दर ४६५६० रुपये असून २४ कॅरेटसाठी ५०७९० रुपये आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.