सर्वसामान्यांना महागडे पेट्रोल आणि डिझेलपासून दिलासा, वाचा आजचे दर

0

मुंबई : देशभरातील पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत काही प्रमाणात घट होताना दिसत आहे. पण तरीही अनेक ठिकाणी पेट्रोल-डिझेलचे दर हे 95 रुपयांच्या पुढेच पाहायला मिळत आहे. त्यामुळे ऐन महागाईत इंधनांच्या वाढत्या किंमतींमुळे सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशाला कात्री लागत आहे. खरंतर, पेट्रोल-डिझेलच्या सातत्याने वाढत असलेल्या दरांमुळे अनेक रेकॉर्ड ब्रेक झाले होते. पण विशेष म्हणजे सलग 14 व्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत बदल होत नसल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.

आपल्या शहरात पेट्रोल डिझेल कितीला विकले जात आहे ते पहा

दिल्लीत पेट्रोल 91.17 रुपये तर डिझेल प्रति लिटर 81.47 रुपये आहे.

मुंबईत पेट्रोल 97.57 रुपये तर डिझेल प्रति लिटर 88.60 रुपये आहे.

कोलकातामध्ये पेट्रोल 91.35 रुपये आणि डिझेल प्रति लिटर 84.35 रुपये आहे.

चेन्नईमध्ये पेट्रोल 93.11 रुपये तर डिझेल 86.45 रुपये प्रति लिटर आहे.

बेंगळुरूमध्ये पेट्रोल 94.22 रुपये आणि डिझेल 86.37 रुपये प्रति लिटर आहे.

भोपाळमध्ये पेट्रोल 99.21 आणि डिझेल 89.76 रुपये प्रतिलिटर आहे.

चंडीगडमध्ये पेट्रोल 87.73 रुपये तर डिझेल 81.17 रुपये प्रतिलिटर आहे.

दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती बदलतात. नवीन दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू आहेत. पेट्रोल डिझेलच्या किंमतीत एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते. परदेशी विनिमय दरासह आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूडचे दर काय आहेत यावर अवलंबून पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज बदलत असतात.

Leave A Reply

Your email address will not be published.