सर्प चावल्याने महिलेचा मृत्यू

0

चाळीसगांव (प्रतिनिधी) : वीट भट्टीवरील काम करणार्‍या एका महिलेला रात्री झोपेत सर्प चावल्याने तिचा पहाटे मृत्यू झाल्याची घटन घडली आहे.

याबाबत माहिती अशी की, येथील नागदरोडवरील वीट भट्टीवर कामगार असलेली महिला सरला भास्कर मोरे ही 40 वर्षीय महिला रात्री भट्टीवरील झोपडीत झोपेत असतांना तिला सर्पदंश झाला होता. मात्र या महिलेचा मृत्यू झाला असून या प्रकरणी शहर पोलीसांत अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे. पुढील तपास पो. ना. नितीन पाटील करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.