पाटणादेवी रस्ता कामाचे रुंदीकरण अतिक्रमणीत बांधकाम काढलीत

0

चाळीसगांव (प्रतिनिधी) : शहरातील पाटणादेवी रस्ता हा गेल्या कित्येक वर्षांपासून खड्डे आणि अतिक्रमणीत झाल्याने रस्ता हा अरुंद झाल्याने या रस्त्यावरुन वाहन चालवणे म्हणजे अत्यंत जिकरीचे झालेले होते.

या रस्त्यांबाबत अनेकवेळा तक्रारी झाल्या होत्या आता या रस्त्यांच्या रुंदीकरण कामाला सार्वजनिक बांधकामाच्या अखत्यारीत सुरुवात झाली असून हा रस्ता शहरापासून कोदगांव रस्त्यावरील वीटभट्टी पर्यंन्त काँक्रीटीकरण करण्याचे काम सुरु झाले असून त्या अनुषंगाने पाटणादेवी रस्त्यावसरील अतिक्रमण आजपासून काढले जात आहे. या रस्त्याच्या कामावर येथील सार्वजनिक विभागाचे सहाय्यक अभियंता नवनाथ सोनवणे, शाखा अभियंता एस. बी. मेढे. सहाय्यक अभियंता किरण चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली रस्ताचे काम सुरु झाले असून या पुढील काळात सुटसुटीत असा रस्ता होणार असल्याने परिसरात समाधान व्यक्त होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.