सरस्वती विद्या मंदिरातील विद्यार्थ्यांनी नववर्षाचे केले पर्यावरणपूरक स्वागत

0
जळगांव – येथील सरस्वती विद्या मंदिरातील विद्यार्थ्यांनी नववर्षानिमीत्त आकर्षक कलाकृती सादर करून पर्यावरणपूरक संदेश दिला. विद्यार्थ्यांनी नववर्षाचे औचित्य साधून अाकर्षक भेटकार्ड तयार केले. विविध संदेश लिहिलेली हि भेट कार्ड विदयार्थ्यांनी लोकांना वाटून प्रदुषण मुक्तीचा संदेश दिला. कला, कार्यानुभव विषया अंतर्गत विदयार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी व प्रबोधन करण्यासाठी स्वनिर्मित आकर्षक पर्यावरणपूरक भेटकार्ड तयार केले.
या उपक्रमाचे आयोजन व नियोजन शाळेच्या शिक्षिका सुवर्णलता अडकमोल व सविता ठाकरे यांचे चांगले सहकार्य लाभले. विद्यार्थ्यांनी पाने, फुले, मोती टिकल्या, स्केच पेन, कार्डबोर्ड, कागद, कात्री, गोंद, माती अादी साहित्याच्या मदतीने अाकर्षक नक्षीकाम केलेले भेटकार्ड बनविले. त्यावर विविध संदेश लिहिण्यात आले. भेट कार्ड तयार करतांना विदयार्थी देहभान हरपून गेले होते. विद्यार्थ्यांनी मिळून जवळजवळ चाळीस पेक्षा अधिक भेटकार्ड तयार केले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष तथा ग स सोसायटीचे अध्यक्ष मनोज पाटील यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देऊन मार्गदर्शन केले. लहानग्यांच्या हातून तयार झालेली हे विवीध अाकर्षक भेटकार्ड लोकांना नववर्षानिमीत्त वाटण्यात अाले. या माध्यमातून त्यांनी प्रदुषण मुक्तीचा संदेश दिला. यामध्ये जास्तीत जास्त विद्यार्थीनी सहभाग घेऊन आपल्या अंगी असलेल्या सुप्त गुणांची चुणुक दाखविली. यावेळी मुख्याध्यापिका कल्पना वसाने, नीलिमा भारंबे, उज्वला ब्रम्हणकर, सुदर्शन पाटील आदी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.