सरदार पटेल लेवा भवन येथे जळगाव सुरक्षा बाजाराचे आयोजन

0

जळगाव | प्रतिनिधी

कोरोना पासून सावध राहण्यासाठी सर्वात महत्त्वाचे म्हणजे घरातच राहणे व सोशल डिस्टन्स राखणे, गर्दी टाळावी या उद्देशाने भारतीय पत्रकार महासंघ जळगांव हेमंत  पाटील ( उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष) व युवा विकास फौंडेशन जळगांव ( विष्णुभाऊ भंगाळे, माजी महापौर मनपा जळगाव) यांच्या पुढाकाराने कोरोनासाठी सर्व प्रकारची सावधानता बाळगून जसे हॅन्डग्लोज, मास्क व आवश्यक ती पुरेपूर स्वच्छता ई. काळजी घेऊन जळगांव शहरातील नागरिकांना चांगल्या प्रतीच्या ( नं 1 क्वालिटी) दूध, भाजीपाला, फळे व किराणा अशा प्रकारच्या जीवनावश्यक वस्तू घरपोहच देण्याची सुविधा “ना नफा ना तोटा”  या तत्वावर उपलब्ध करून देण्यात येत आहे. बी. एस. एन. एल. ऑफिस मागे आंबेडकर मार्केट जवळ सरदार वल्लभभाई पटेल लेवा भवन येथे जळगाव येथे सकाळी 9 ते रात्री 8 वाजेपर्यंत सुरक्षा बाजाराचे आयोजन करण्यात आले आहे. या ठिकाणी येऊन नागरिकांनी गर्दी न करता भाजीपाला खरेदी करता येणार आहे. तसेच ऑर्डर नुसार इतर जीवनावश्यक वस्तू घरपोहोच देण्यात येणार आहे.

त्यासाठी जळगावकर नागरिकांनी 7887822226 या क्रमांकावर फोन अथवा व्हाट्सएपच्या माध्यमातून ऑर्डर पाठवावी असे आवाहन देखील करण्यात आले आहे.  सदर घरपोहच सुविधा फक्त जळगांव शहरातील नागरिकांसाठी आहे.

नागरिकांची मागणी भरपूर असल्याने ऑर्डर देतांना एकदिवस अगोदर ऑर्डर दिल्यास होम डिलिव्हरी देणे सोईचे होईल व वस्तूंची ऑर्डर देतांना दिवसातून एकदाच द्या

नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंची होम डिलिव्हरीसाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही.

या संधीचा जळगांवकरांनी योग्य पध्दतीने लाभ घ्यावा  व घरातच राहून सहकार्य करावे. आणि आपली व आपल्या परिवाराच्या आरोग्याची काळजी घ्या.

नागरिकांना काही सूचना व मार्गदर्शन तसेच अभिप्राय द्यावयाचे असल्यास मो. 7887822226 या व्हाट्सएप नंबर वर पाठवाव्यात.

वाटपाचे ठिकाण : सरदार वल्लभभाई पटेल लेवा भवन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्केट शेजारी जळगाव

संपर्क  : श्री हेमंत पाटील- ९५११२९५१७९, श्री सागर ओतारी- ९९७००५३०६६ ,श्री राकेश कोल्हे- 9420940926 (केंद्रीय उपाध्यक्ष भारतीय पत्रकार महासंघ, जळगाव), श्री. हेमंत काळुंखे ( महानगर जिल्हाध्यक्ष ),  श्री चंद्रकांत वारके- 9370767410

Leave A Reply

Your email address will not be published.