सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर ! महागाई भत्त्यात झाली ‘ही’ वाढ

0

मुुंबई – आगामी विधानसभा निवडणूकीच्या पाश्वभूमिवर राज्य सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांना खूश केले आहे. सातव्या वेतन आयोगानुसार राज्य शासकीय कर्मचारी व इतर पात्र पूर्णकालिक कर्मचाऱ्यांच्या महागाईभत्त्यात 3 टक्के वाढ करण्यात आली आहे.

त्यामुळे महागाई भत्त्याची टक्केवारी 9 टक्क्‌यांवरून 12 टक्के इतकी झाली आहे, अशी माहिती वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. यासंदर्भात शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.1 जानेवारी 2019 पासून 7 व्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतनसंरचनेतील मूळ वेतनावरील अनुज्ञेय महागाई भत्त्याच्या दरात ही वाढ करण्यात आली आहे. ही वाढ 1 जुलै 2019 पासून रोखीने देण्यात येईल तर 1 जानेवारी ते 30 जून 2019 या कालावधीतील थकबाकीबाबत स्वतंत्रपणे आदेश निर्गमित केले जातील असे मुनगंटीवार यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.