राज ठाकरे भेटले सोनिया गांधींना ; भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण

0

नवी दिल्ली – मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कॉंग्रेस नेत्या सोनिया गांधी यांची भेट घेतली. उभय नेत्यांमधील चर्चेचा तपशील कळू शकला नसला तरी महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक ईव्हीएम मशिनऐवजी बॅलेट पेपरने घेण्याच्या मुद्यावर विस्तृत चर्चा झाली असल्याचे समजते. राज ठाकरे आणि सोनिया गांधी यांची ही पहिलीच भेट होय.


या दोन नेत्यांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा झाली. या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. मनसेने कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत यावे, असा आग्रह आधीपासूनच राष्ट्रवादीने धरलेला आहे. आता राज यांनी सोनियांची भेट घेतल्याने महाराष्ट्रात येत्या विधानसभेला नवी राजकीय जुळवाजुळव पाहायला मिळेल, अशी शक्‍यता बळावली आहे.

0
18070 posts 260 comments
You might also like More from author
Leave A Reply

Your email address will not be published.