समाधानकारक पाऊसामुळे खरीप पिकाची स्थिती बरी!

0

चोपडा – तालुक्यात खरीप हंगाम सण २०१९-२० अंतर्गत पीक परिस्थिती समाधानकारक पावसामुळे बरी दिसत असली तरी बी टी कापूस वाण सोडला तर ज्वारी बाजरी  मका मूग उडीद चवळी  हि पिके चांगली येतील असा कयास व्यक्त होत आहे.
कापूस बी टी वाण यंदा जनरेशन गॅप होतो कि काय अश्या अवस्थेत असून कापसाच्या झाडाला  कैरी कमी आणि पाला जास्त दिसून येतो सततच्या ढगाळ वातावरणामुळे कापूस पिकावर मावा तुळतुळे पांढरी माशी आदी किडीचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी महागडी औषधी उलाला रक्षक स्पार्क अश्या औषधांचे फवारे मारण्यात व्यस्त आहेत.
कापूस केळी ज्वारी हि प्रमुख पिके चोपडा तालुक्यात घेतली जातात यावर्षी तीळ पीक फार कमी क्षेत्रावर पेरले जाते एक महिनाभर उशिराने खरीप हंगाम सुरु झाल्याने यंदा पोळ्याला मूग टिपू शकले नाहीत बागायती क्षेत्रात कापूस व अन्य  पिकांमध्ये टोकन पद्धतीने लावलेला मूग व उडीद काढणीस आला आहे. पावसाळा सुरु झाल्यानंतर पेरणी झालेले मूग उडीद मूग बाजरी सोयाबीन ज्वारी  मका ह्या पिकांना दाणे भरण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे.
ऊस लागवड  क्षेत्रात घट- चो.सा. का. कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सन २०१६ -१७ चे पेमेंट अडीच कोटी रुपये कारखाना संचालक मंडळाने थकीत केल्यामुळे शेतकरी यांनी ऊस पीक नको रे बाबा म्हणून पाठ फिरवली आहे त्यामुळॆ नवीन लागवड थांबली आहे चो. सा.  का. संचालक मंडळ कारखाना भाडे तत्वावर  चालविण्यासाठी तयार आहेत परंतु इच्छुकांनाच इच्छा नाही त्यामुळे सर्वपक्षीय नेते हतबल झाली आहेत. चो. सा. का. च्या दुर्गतीस सर्व पक्षीय नेते जबाबदार असल्याचे सर्वदूर बोलले जात आहे परिणामी कारखाना भविष्यात चालवून शेतकऱ्यांना यापासून काहीतरी न्याय मिळेल या पोकळ आशावादावर शेतकरी नाखूष आहे
संकरित कापसाला भाव द्या – शासनाने संकरित कापसाला किमान आधारभूत किंमतीपेक्षा अधिक भाव द्यावा अशी शेतकऱ्याच्या रास्त अपेक्षा होय. येत्या गणेश चतुर्थीला कापसाचे मुहूर्त होईल त्या अनुषंगाने शेतकऱ्यांना व्यापारी वर्गाकडून चागल्या भावाची अपेक्षा असून ८०%पाऊस चोपडा तालुक्यात आजमितीस झाल्याचे पर्जन्यमानाच्या आकडेवारीनुसार दिसते तरीही नद्या नाले पांझर तलाव बंधारे धरण क्षेत्रात अजूनही दमदार पावसाची अपेक्षा आहे उत्तर नक्षत्रात एकदा पूर आला तर रब्बी हंगामासाठी व आगामी उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी हा पाऊस जलसंजीवनी ठरणार आहेत शेतकरी आशावादी आहे सर्वकाही आता निसर्गाच्या स्वाधीन होय     

Leave A Reply

Your email address will not be published.