समता शिक्षक परिषदेच्या प्रयत्नांना यश !

0

 जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  

महाराष्ट्र राज्य समता शिक्षक परिषदेच्या वतीने 16 सप्टेंबर रोजी नाशिक  विभागाचे शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी यांची भेट घेतली होती. संघटनेचे माध्यमिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष भरत शिरसाठ सर प्राथमिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्र गायकवाड, नाशिकचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत गायकवाड, जळगावचे जिल्हाध्यक्ष रणजीत सोनवणे यांचा शिष्टमंडळामध्ये समावेश होता. संघटनेच्यावतीने त्यांना खालील मागण्यासाठी निवेदन देण्यात आले होते.

1.पाच तारखेच्या आत शिक्षकांचे वेतन झालीच पाहिजे.

2.जिल्ह्यामध्ये एक वर्षापूर्वीपासून मेडिकल बिले निधी अभावी थकित आहेत. सदर बिलांकरीता निधी त्वरित उपलब्ध व्हावा.

3.वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणापासून एकही शिक्षक वंचित राहू नये.

4. शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचार संपविण्याकरीता ठोस प्रयत्न करावेत.

वरील विषयाच्या अनुषंगाने आदरणीय उपसंचालकांनी संबंधित विभागांकडे तातडीने पाठपुरावा केलेला होता व तसे आदेश दिले होते. त्याचा परिणाम म्हणून जळगाव जिल्ह्यामध्ये पाच तारखेच्या आत वेतन निघायला सुरुवात झाली आहे. तसेच उपासनी यांच्याशी  आज सकाळी झालेल्या दूरध्वनी संभाषणा नुसार येत्या पंधरा दिवसांमध्ये जिल्ह्यातील सर्व मेडिकल बीलांकरीता निधी उपलब्ध करून दिला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच शिक्षकांचे कोणतेही प्रश्न तातडीने सोडविले जातील असे आश्वासन सुद्धा त्यांनी दिले आहे.

पाच तारखेच्या आत पगार झाल्यामुळे शिक्षकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. उपासनी यांनी  शिक्षकांच्या समस्यां संदर्भात दाखवलेल्या जागरुकते बद्दल महाराष्ट्र राज्य समता शिक्षक परिषदेच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.