संस्कृती कला क्रीडा प्रतिष्ठान आयोजित माघी गणेशोत्सव व शिवजन्मोत्सव साजरा!

0

मुरबाड  (सुभाष जाधव) मुरबाड तालुक्यातील सह्याद्रीच्या पायथ्याशी वसलेले तुळई हे गाव या ठिकाणी संस्कृती कला व क्रीडा प्रतिष्ठान तुळई आयोजित सार्वजनिक माघी गणेशोत्सव गेली 2013 पासुन या गावात संस्कृतीचे जतन करून या प्रतिष्ठान ने सालाबाद प्रमाणे माघी गणेशोत्सव व शिवजन्मोत्सव व लहान मुलांनी खेळांमध्ये प्रावीण्य मिळवलेले आणि महिलांनी फुगडी, लिंबू चमचा टिकली लावण्याचा कार्यक्रम, पोते स्पर्धा यासारखे विविध खेळ ग्रामीण भागातील महिलांना उत्तेजन देण्याचा प्रेरणा देण्याचा एकविरा प्रयत्न या संस्कृतिक कला व क्रीडा प्रतिष्ठान यांनी प्रयत्न केलेला आहे तो यामध्ये दिसून येत आहे 2013 पासून ते2021 पर्यंत या प्रतिष्ठानने सर्व पदाधिकाऱ्यांनी अहोरात्र मेहनत घेऊन कार्यक्रम करण्याचा जो प्रयत्न आहे यामध्ये कलागुणांना वाव व महिलांना पुढे येण्याचा एक चांगला प्रयत्न यांच्या परी कष्टातून निर्माण झालेला दिसून येत आहे.

या प्रतिष्ठानला प्रेरणा देण्याचं काम लहानपणापासून राजकारणामध्ये सक्रिय असे शिवसेना उपतालुका प्रमुख व श्री कंट्रक्शन व गेली तीस ते पस्तीस वर्ष ग्रामपंचायतीमध्ये ते निवडून जातात राजकारणातील एक दांडगा अनुभव व्यक्ती बाळा भाऊ चौधरी यांच्या संकल्पनेतून संस्कृती कला व क्रीडा प्रतिष्ठान तुळई. यांची प्रेरणा घेऊन हे प्रतिष्ठान काम करत आहे यावेळी बक्षीस वितरणाचा सुद्धा कार्यक्रम करण्यात आला हा दुग्धशर्करा योग या गावात दिसून आला.

 

यावेळी विचार मंचावर ज्येष्ठ नागरिक रामुकाका चौधरी तुकाराम बाबा चौधरी बाबा साबळे जयवंत दादा साबळे तुळई गावचे प्रथम  नागरिक कविता संतोष चौधरी सरपंच व उपसरपंच कविता तानाजी चौधरी ग्रामपंचायत सदस्य बाळा भाऊ चौधरी, ग्रामपंचायत सदस्य अमोल सुरेश चौधरी, ग्रामपंचायत सदस्य सुरेखा रमेश चौधरी, ग्रामपंचायत सदस्य कृष्णा चव्हाण, पोलीस पाटील शिवाजी चौधरी ,आरोग्य सेवक रमेश बंधू चौधरी, वाहन चालक चंदू दादा भोईर ,माजी ग्रामपंचायत सदस्य सुगंधा पांडुरंग चौधरी व पत्रकार सुभाष जाधव, संतोष चौधरी ,जयवंत कंटे, सागर खोलंबे व सर्व प्रतिष्ठानचे पदाधिकारी व गावातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिक महिला व लहान मुले कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित होते

Leave A Reply

Your email address will not be published.