शिवरायांचे आठवावे रूप -शिवरायांचा आठवावा प्रताप

0

भुसावळ (प्रतिनिधी)- 

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेवून सर्वानी शासनास सहकार्य करून त्रिसूत्री राबवून आपल्या लाडक्या रायाचा जन्मोत्सव मोठ्या आनंदाने व उत्साहाने शहर व परिसरात ठिकठिकाणी साजरा केला .

अखिल भारतीय मराठा महासंघ शाखा भुसावळ तर्फे 

छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली .  प्रसंगी रेल्वे स्टेशन परिसरातील भव्य अश्या अश्वारूढ पुतळयाचे पूजन  अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाउपाध्यक्ष गोविंदा पाटिल यांचे हस्ते पूजन करण्यात येवून माल्यार्पण करण्यात आले . यावेळी सामाजिक कार्यकर्ते जे बी कोटेचा , नगरसेवक तथा  शिक्षण समिती सभापती मुकेश गुंजाळ , प्रा नाना पाटिल , प्रा डॉ जगदीश पाटिल , महेंद्र पाटिल , प्रतापराव पाटिल ,राजेन्द्र निकम, मधुकरराव   हिंगणे, विनोद जाधव , राहुल पाटिल , डी के पाटिल , रविन्द्र चौधरीं , साहेबराव पाटिल , ज्ञानेश्वर जगदाळे , सचिन डेलीवाला, कैलास डिडवानी ,राजू आवटे , किरण पाटिल , एडव्होकेट तुषार पाटिल , महिला पादाधिकारी अलका भगत ,  यांचेसह अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते उपस्थितांनी सुद्धा महाराजांचे पुतळयास  त्रिवार मुजरा करून माल्यार्पण केले .

भुसावळात  शिवजयंतीच्या निमित्ताने वृक्षारोपण ; ज्येष्ठ नागरिकांचा उपक्रम

 येथील दत्तनगर मधील श्री त्रिमुखी दत्त मंदिराचे अध्यक्ष व निसर्ग पर्यावरण प्रदूषण मंडळाचे राज्य सल्लागार वैद्य श्री रघुनाथ आप्पा सोनवणे, निसर्ग मंडळाचे जिल्हाध्यक्ष नाना शंकर पाटील , प्रमुख पाहुणे डॉ. डी .एस. पाटील , राज्य तथा जिल्हामार्गदर्शक सुरेंद्रसिंग पाटील उपस्थित होते यावेळी श्री त्रिमुखी दत्त मंदिराच्या परिसरात शिव जयंतीच्या निमित्ताने वृक्षारोपण करण्यात आले मंदिरात च्या सभोवती निंब , वड, पिंपळ, कांचन , उंबर अशा विविध  वृक्षांचे वृक्षारोपण शिवजयंतीच्या निमित्ताने करण्यात आले यावेळी  सर्व जेष्ठ्य नागरिक , मंदिराचे पदाधिकारी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले,

यावेळी निसर्ग समितीचे राज्य सल्लागार यांनी कोरोनाची परिस्थितीचा विचार करून शिवजयंतीच्या निमित्ताने पर्यावरण पूरक झाडे लावण्याचा उपक्रम आपल्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून राबविला यासाठी निसर्ग पर्यावरण मंडळाचे जिल्हाध्यक्ष नाना शंकर पाटील यांनी या कार्यक्रमाला मार्गदर्शन केले . शिवजयंती वेगळ्या स्वरूपात ज्येष्ठ नागरिक यांनी वृक्षारोपण करुन साजरी या उपक्रमाचे कौतुक केले, यावेळी जेष्ठ नागरिक डॉ. डी. एस. पाटील, जिल्हाध्यक्ष नाना पाटील, अष्टभुजा ज्येष्ठ नागरिक अध्यक्ष  रघुनाथ आप्पा सोनवणे, सुरेन्द्रसिंग पाटील, रमेश साखळकर, वसंत बोरनारे, श्री. राणे, मधु ढाके, काशिनाथ पाटील , श्री चौधरी, श्री सिंगतकर, श्री बऱ्हाटे, श्री वाणी, ह.भ.प.पांगडेताई, व इतर महीला भगिनी , श्री त्रिमुखी दत्त मंदीराचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

श्री शिवाजी सर्वोदय छात्रालय येथे शिवजयंती साजरी

येथील श्री शिवाजी सर्वोदय छात्रालय येथे  (मराठा समाज मंदिर )शिवजयंती साजरी करण्यात आली . यावेळी छत्रपतीं शिवाजी महाराजांच्या पुतळयाचे पूजन संस्थेचे सेक्रेटरी प्रकाश कडू पाटिल यांनी सपत्नीक पूजन केले.

यावेळी विश्वस्त धर्मराज राघो पाचोरे , विनोद पुंडलिक चौधरीं, नगराध्यक्ष रमण भोळे , पालिका मुख्याधिकारी चिद्रवार, उपनगराध्यक्ष रमेश नागराणी , आरोग्य सभापती प्रा राठी , मराठा महासंघाचे गोविंद पाटिल , मुख्याध्यापक अरुण धनपाल , सौ लीना वानखेड़े , व सर्व शिक्षक व शिक्षकेतर नगरसेवक वसंत पाटिल, नाना पाटिल सर, जे बी कोटेचा , महेंद्र पाटिल आदी उपस्थित होते .

Leave A Reply

Your email address will not be published.