संत ज्ञानेश्वर विद्यालयात पालक शिक्षक सभा

0

जळगाव : मेहरूण येथील संत ज्ञानेश्वर प्राथमिक विद्यालयात  पालक शिक्षक सभा घेण्यात आली. सभेत विविध विषयांवर चर्चा होऊन पालकांच्या सूचना नोंदवून घेण्यात आल्या.

 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका शीतल कोळी होत्या. श्री संत ज्ञानेश्वर महाराज क्रीडा, सांस्कृतिक व शैक्षणिक मंडळाचे सचिव मुकेश नाईक यांनी उपस्थित पालकांना विद्यालयातील व संस्थेच्या उपक्रमांची माहिती दिली. तसेच सभेत फी वाढ, वेळेचे महत्व, शैक्षणिक सहल, मुलांच्या अभ्यासाचे नियोजन तसेच मुलांच्या सांस्कृतिक, शैक्षणिक व क्रीडा विकासासाठी असलेले योगदान याविषयी चर्चा होऊन पालकांच्या सूचना नोंदवण्यात आल्यात.

 

तसेच मुलांच्या समस्यांवर सकारात्मक संवाद व पालकांच्या समस्या ऐकून घेण्यात आल्या. प्रसंगी विद्यालयातील शिक्षक उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.