श्री दत्त देवस्थान उर्फ अवधूत मठी भडगाव येथे दीपोत्सव साजरा

0

भडगाव (प्रतिनिधी) : येथील श्री दत्त देवस्थान उर्फ अवधूत मठी येथे दर सालाबादाप्रमाणे यंदाही 7000 दिवे लावून दीपोत्सव साजरा करण्यात आला यावेळी माजी नगरसेवक डॉ. विजयकुमार देशमुख, केशवसुत न्यान प्रबोधिनीचे अध्यक्ष विजय देशपांडे, विश्वस्त डॉ ईश्र्वरसिंग परदेशी, विश्वस्त जनार्दन दातार, डॉ दुर्गेश रुले, गणेश मालपुरे, रघु पाटील, सचिन दाभाडे, संजय पाटील आदी उपस्थित होते.

श्री क्षेत्र पंत बाळेकुंद्री बेळगाव येथून सन 2008 साली श्री दत्त मठी भडगाव येथे पायी ज्योत आणण्यात आली  तेव्हा पासून हा दीपोत्सव    सुरू करण्यात आला. या उत्सवासाठी जळगाव जिल्ह्यासह इतर भागातून ही मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते या दिवसासाठी अवधूत मठी ट्रस्ट अध्यक्ष व प्रतिष्ठानचे गादीपती द भ प मिलिंद महाराज दातार भडगावकर यांचे मार्गदर्शन लाभले . भाऊबीज  सणानंतर येणाऱ्या  पहिल्या गुरुवारी हा दीपोत्सव साजरा करण्यात येतो. यंदा या दीपोत्सवा साठी 7000 दिव्यांची रोशनई  करण्यात आली होती मंदिरासह परिसराचे मनमोहक दृश्य अनेकांनी आपल्या मोबाईल मध्ये कैद करण्याचा मोह मात्र आवरता आला नाही या मनमोहक दृश्याने अनेकांचे डोळ्याचे पारणे फिटले.

Leave A Reply

Your email address will not be published.