श्री. गो. से. हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव

0

पाचोरा :- पाचोरा तालुका  शिक्षण प्रसारक संस्था संचलित श्री. गो. से. हायस्कूल पाचोरा येथे इयत्ता दहावी  मार्च – २०१९ परीक्षेत जळगाव जिल्ह्यातून  प्रथम आलेली  कुमारी अबोली मांडगे व प्रथम पाच विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प प्रमानपत्र तसेच पालकांचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष दिलीप वाघ यांच्या हस्ते करण्यात आला. त्याच बरोबर श्री. गो. से. हायस्कूल पाचोरा शाळेच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा रोवणारे.  विद्यार्थी व त्यांच्या पालकांचा सत्कार संस्थेचे चेअरमन संजय वाघ यांचा हस्ते, शालेय समितीचे चेअरमन  खलील देशमुख, तांत्रिक विभागाचे चेअरमन वासुदेव महाजन यांच्या हस्ते करण्यात आला. नुकताच इयत्ता आठवी व पाचवी शिष्यवृत्तीचा निकाल जाहीर झाला. इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत विद्यालयातील शहरी भागात एकूण चार विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत. त्या विद्यार्थ्यांची नावे – ऋषिकेश प्रकाश न्याती, दिपाली प्रल्हाद सोनवणे, प्राजक्ता मनोज दुसाने, सुमित प्रदीप पाटील तसेच इयत्ता पाचवी तून चार विद्यार्थी शिष्यवृत्ती पात्र ठरले आहेत.

त्यांची नावे – प्राची मंगेश मिसाळ, रिद्धी राहुल तोतले, प्रणाली दिगंबर चौधरी, हितेश संजय वाकलकर.

या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन व कौतुक करण्यात आले. याप्रसंगी  पाचोरा तालुका सहकार्य शिक्षण प्रसारक  संस्था पाचोराचे अध्यक्ष दिलीप वाघ, चेअरमन संजय वाघ, मानद सचिव महेश देशमुख, व्हाईस चेअरमन व्ही. टी. जोशी, शालेय समितीचे चेअरमन खलील देशमुख, तांत्रिक विभाग चेअरमन वासुदेव महाजन, जेष्ठ संचालक मधुकर पाटील, योगेश पाटील, सतिष चौधरी, शाळेचे मुख्याध्यापक  एस. डी. पाटील, उपमुख्याध्यापक एस. एल. वाघ, पर्यवेक्षिका पी. पी. पाटील, धुडेकर मॅडम, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रमिला वाघ, आर. एल. पाटील, एन. आर. ठाकरे,  एस. एन. पाटील, प्रमोद पाटील, व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचलन  ए. बी. अहिरे यांनी केले. महेश  कौडिण्य यांनी आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.

Leave A Reply

Your email address will not be published.