मराठवाड्यात पाऊस बरसला ; कोरड्या नदीपात्रात वाहू लागले पाणी

0

बीड :   बहुप्रतीक्षेत असलेल्या मान्सूनने अखेर मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यात शुक्रवारी रात्री हजेरी लावली. या पावसाने कोरड्या पडलेल्या नदीपात्रात चांगलेच पाणी वाहत आहे. बीडनजीक असलेल्या नामलगाव येथे नदी पाण्याची पुजाकरण्यात आली. अनेक दिवसांपासून दुष्काळाचे चटके सहन करणाऱ्या बीडवासियांना शुक्रवारी रात्री झालेल्या पावसाने काहीसा दिलासा मिळाला आहे.

कोकणात वर्दी लावल्यानंतर अखेर मान्सूननं मराठवाड्यातील उस्मानाबाद, परभणी, हिंगोली, बीड जिल्ह्यात मुसळधार पावसानं हजेरी लावल्याने बळीराजा सुखावला आहे. तर परभणी शहरासह सेलू, मानवत, पाथरी तालुक्यात मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. रात्री बारा ते एक वाजताच्या दरम्यान बीड दारू आणि माजलगावच्या काही भागांमध्ये चांगला पाऊस झाला. बीड पासुन जवळच असलेल्या नामलगाव आणि परिसरात एक मिलिमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद करण्यात आली आहे. तब्बल अर्धा ते एक तास झालेल्या पावसामुळे बीड जवळून वाहणाऱ्या करपरा नदीपात्रामध्ये पाणी वाहू लागले. बीडमध्ये पावसाची सुरुवात झाल्यामुळे सर्वसामान्य नागरिक आणि बळीराजा सुखावला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.