शेतकऱ्यांना त्रास द्याल तर गाठ माझ्याशी – आ. किशोर पाटील

0
 पाचोरा येथील आढावा बैठकीत वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांची कानउघडणी
 पाचोरा  प्रतिनिधी
      गेल्या तीन / चार वर्षांपासून कमी – अधिक पावसामुळे शेतकरी भरडला जात असुन त्याचेवर देशोधडीला लागण्याची वेळ आली आहे. यावर्षी अतिवृष्टी झाल्यामुळे खरीपातील हाती आलेले पिक पुर्णपणे वाया गेले आहे. यामुळे शेतकरी नैराश्याच्या वातावरणात आहे. ज्यादा पावसामुळे सद्यस्थितीत प्रकल्प, विहीरी, नद्या, नाल्यांना पाणी असल्यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात रब्बी हंगामात विविध पिकांची पेरणी केलेली असल्याने ग्रामीण भागात विज वितरण कंपनीकडुन केवळ चार तास विज पुरवठा होत आहे. अनेक शेतकऱ्यांनी अनेक वर्षांपासून डिमांड नोट भरलेली असुनही त्यास विज कनेक्शन दिले जात नाही. रोहित्र (डी.पी.) जळाल्यास आठ ते पंधरा दिवस शेतकऱ्यांना रोहित्र दिले जात नसल्याने शेतकऱ्यांना विहीरीत पाणी असुनही पिकांना पाणी देता येत नाही. स्थानिक पातळीवर शाखा अभियंता व वायरमन शेतकऱ्यांचे विज कनेक्शन कट करणे, वायरी जमा करणे अशा अनेक तक्रारी आल्याने आमदार किशोर पाटील यांनी विज वितरण कंपनी विषयी अतिषय तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करुन यापुढे शेतकऱ्यांना त्रास दिल्यास गाठ माझ्याशी आहे. अशा शब्दात विज वितरण कंपनीच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना खडेबोल सुनावले. व विज वितरण कंपनीस निधी कमी पडत असल्यास त्यासाठी मी पालकमंत्र्यांच्या मागे लागुन निधी उपलब्ध करून देईल असे सांगितले.
        पाचोरा येथील राजीव गांधी टाऊन हॉल मध्ये दि. १६ रोजी विज वितरण कंपनीच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी नगराध्यक्ष संजय गोहिल, उपनगराध्यक्ष शरद पाटे, जिल्हा परिषद सदस्य पदमसिंग पाटील, रावसाहेब पाटील, सेनेचे जिल्हा उपप्रमुख गणेश पाटील, शेतकरी सेनेचे जिल्हा प्रमुख अरुण पाटील, तालुका प्रमुख शरद पाटील, शहर प्रमुख किशोर बारावकर, अनिकेत सुर्यवंशी, नगरसेवक सतिष चेडे, गंगाराम पाटील, बापु हटकर, विकास पाटील, विज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता ए. एल. वडार, उपकार्यकारी अभियंता आर. व्ही. शिरसाट,ए एन राठोड,अजय धामोरे, उपाभियंता दिपक पाटील (शहर) दिपक पाटील (ग्रामिण) हेमंत पाटील,हर्षल पाटील, दिपक महाजन, अविनाश चव्हाण,सह पाचोरा भडगाव तालुक्यातील लाईनमन, वायरमन मोठ्या संख्येने उपस्थित होते. आढावा बैठकीत आमदार किशोर पाटील यांनी पाचोरा – भडगाव तालुक्यात ज्या गावांना ३३/११ सब स्टेशन मंजुर झाले आहे त्यावर तात्काळ कारवाई करावी, अनेक ठिकाणी विज वितरण कंपनीची स्थापना झाल्यापासून लावलेल्या तारा त्याच असुन त्याची काल मर्यादा २५ वर्षांची असतांना त्या अद्याप बदलविलेल्या नसल्यामुळे अनेक ठिकाणी नागरिक मृत्युमुखी पडुन गुरे ही दगावली आहेत. शाॅर्टसर्कीटमुळे अनेक घरांना आग लागल्यामुळे मोठ्या स्वरुपाची जिवीत व वित्तहाणी होत असतांनाही अधिकारी, कर्मचारी याकडे दुर्लक्ष करीत आहे. गुढे येथे सब स्टेशन मंजुर झालेले असतांनाही त्याचे काम मार्गी लागत नाही. अशा अनेक समस्या आहेत. शेतकऱ्यांना रब्बीच्या पिकास पाणी देण्यासाठी तात्पुरते विज कनेक्शन द्या अन्यथा थेट आकडे टाकुन पाणी देण्याचा सल्ला आम्ही देवु. शेतकऱ्यांवर अन्याय करणाऱ्यांची गय केली जाणार नाही. निधी व कर्मचारी संख्या कमी असल्यास विज जानेवारी पर्यंत आढावा सादर करा त्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले जातील. मात्र जाणुनबुजून शेतकऱ्यांना त्रास देण्याचा प्रयत्न केल्यास त्यास शिवसेना स्टाईलने उत्तर दिले जाईल. अशा प्रखर शब्दात आ. किशोर पाटील यांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांना खडसावले. बैठकीत अनेकांनी विज वितरण कंपनीचे कर्मचारी पैशांची मागणी करत असल्याच्याही तक्रारी केल्या. आढावा बैठकीचे सुत्रसंचलन नाना वाघ यांनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.