शेतकऱ्यांना केंद्राचा मोठा दिलासा ; डीएपी खताची गोणी २४०० ऐवजी मिळणार ‘इतक्या’ रुपयाला

0

नवी दिल्ली : केंद्र सरकार ने शेतकऱ्यांबाबत एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने डीएपी म्हणजेच आमोनियम फॉस्फेट (DAP) खतांवर मिळणारे अनुदान 14% नी वाढवले आहे. शेतकऱ्यांना डीएपी आता 1200 रुपये गोणी या दराने DAP Fertilizer Rate मिळणार आहे. पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या एका महत्त्वपूर्ण बैठकीत डीएपीवर 500 रुपये प्रति गोणीवरुन वाढ करत अनुदान 1200 रुपये प्रति गोणी करण्यात आले. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पंतप्रधान मोदी यांनी ट्विटरवर म्हटले की, सराकार शेतकऱ्यांचे जीवनमान उंचविण्यासाठी कठीबद्ध आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय दरांमध्ये वाढ होऊनही आम्ही त्यांना जुन्या दरांनीच खत पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. आजच्या निर्णयानंतर डीएपी खत प्रति गोण 2400 रुपयांऐवजी 1200 रुपये दराने मिळेल.

पंतप्रधान कार्यालयाने एका प्रतिक्रियेत म्हटले आहे की, बैठकीत पंतप्रदांनानी जोर देत म्हटले की, आंतरराष्ट्रीय किमतींमध्ये वाढ झाल्यानंतरही शेतकऱ्यांना जुन्याच किमतीने खत मिळायला हवे.

शेतकऱ्यांचे कल्याण हे सरकारचे सर्वोच्च प्राधान्य आहे. डीएपी खतासाठी अनुदान 500 रुपये प्रती गोण ते 140% वाढवून 1200 रुपये प्रति गोण करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. अशा पद्धतीने डीएपीची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत वाढल्यानंतरही ते 1200 रुपये प्रति गोण या जुन्या बाजारभावानेच शेतकऱ्यांना मिळणार असा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. अनुदानापोटी येणारा अधिकचा भार केंद्र सरकारने उचरण्याचा निर्णय घेतला आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.