शेतकरी संघटनेच्या संघर्षास अखेर यश ; कापूस पीक विमा मंजूर

0

पारोळा (प्रतिनिधी) :पारोळा तालुक्यात पाच महसूल मंडळ असून त्यात तामसवाडी पारोळा शेळावे बहादरपूर चोरवड अशा महसुल मंडळातील शेतकऱ्यांनी कापूस पिकासाठी एकूण शेतकरी संख्या १२२ ९० एकूण क्षेत्र १३७७९ हेक्टर रक्कम 251120679 एवढी मंजूर झाली असून पारोळा तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये आनंद दिसत आहे.

बऱ्याच दिवसापासून शेतकरी संघटनेने लढा सुरू ठेवलेला होता मागील वर्षी अतिवृष्टी अवकाळी पाऊसाने जोरदार थैमान घातले होते शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास अतिवृष्टीने हिरावून घेतलेला होता. शेतकऱ्यांचे पांढरे सोने म्हणुन गणले जाणारे आद्य व रोखीचे पीक कापूस रोगग्रस्त होऊन शेतात गेला होता व ज्वारी मका पिकावर हिरवे कोंब दिसू लागले होते अशा वेळोवेळी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरून कृषी मंत्री मुख्यमंत्री यांना निवेदन देऊन पिक विमा बाबत न्यायाची भूमिका घेऊन मागणी करत होते. तालुक्यातील शेतकऱ्यांच्या व शेतकरी संघटनेच्या लढ्यास अखेर यश आले असून शेतकरी वर्ग खुश असल्याचे दिसत आहे.

शासन-प्रशासन कृषी विभाग व पिक विमा कंपनी यांच्याशी शेतकरी संघटना सतत पिक विमा मिळावा म्हणून पाठपुरावा करत होते आज शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरचे समाधान हेच शेतकरी संघटनेचे यश आहे असे मत किशोर पाटील जोगलखेडे तालुका अध्यक्ष शेतकरी संघटना पारोळा यांनी ‘दैनिक लोकशाही’च्या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केले,

Leave A Reply

Your email address will not be published.